परीला सोडून नेहा जाणार लंडनला; एकटी पडणार चिमुकली परी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2022 13:04 IST2022-05-06T13:04:16+5:302022-05-06T13:04:47+5:30
Mazi tuzi reshimgath: या मालिकेत सध्या नवनवीन ट्विस्ट येत आहेत. यामध्ये आणखी एक मोठा ट्विस्ट येणार असून नेहा, परीला एकटं सोडून लंडनला जाणार आहे.

परीला सोडून नेहा जाणार लंडनला; एकटी पडणार चिमुकली परी
'माझी तुझी रेशीमगाठ' ही मालिका सुरु झाल्यापासून लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. या मालिकेच्या निमित्ताने पहिल्यांदाच श्रेयस तळपदे (shreyas talpade) आणि प्रार्थना बेहरे (prarthana behere) ही फ्रेश जोडी प्रेक्षकांना एकत्र पाहायला मिळाली. उत्तम कथानकासह कलाकारांच्या अभिनयामुळे लोकप्रिय झालेल्या या मालिकेत सध्या नवनवीन ट्विस्ट येत आहेत. यामध्ये आणखी एक मोठा ट्विस्ट येणार असून नेहा, परीला एकटं सोडून लंडनला जाणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून नेहा आणि परी, यशसोबत त्याच्या घरी पॅलेसमध्ये रहात आहेत. परंतु, आपल्या गोड स्वभावामुळे चिमुकल्या परीने अवघ्या काही दिवसांमध्येच घरातल्यांना आपलंसं केलं. त्यामुळे घरातील प्रत्येकाला परी आता त्यांचीच लेक वाटू लागली आहे.म्हणूनच, परीदेखील आता चौधरी कुटुंबात समरसून गेली आहे. एकीकडे परीवर प्रेमाचा वर्षाव होत असतानाच परीची आई तिच्यापासून दुरावणार आहे.
सध्या सोशल मीडियावर या मालिकेचा एक प्रोमो व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये नेहा, परीला एकटं सोडून लंडनला जाणार आहे. ऑफिसचं काही काम असल्यामुळे नेहाला काही दिवसांसाठी लंडनला जावं लागणार आहे. मात्र, तिच्या गैरहजेरीत तिच्या लेकीकडे कोण पाहणार हा मोठा प्रश्न तिला पडला आहे.
दरम्यान, 'तू निश्चिंतपणे लंडनला जा परीकडे आम्ही पाहू', असं यशचे काका-काकू मिथीला आणि सत्यजीत सांगतात. तसंच बंडू काका-काकूदेखील परीसोबत आहेत. त्यामुळे या सगळ्यांच्या भरोशावर टाकून नेहा काही दिवसांसाठी लंडनला जाणार आहेत. मात्र, या काळात सिम्मी परीसोबत कशी वागते, तिला त्रास देते का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.