नवरी मिळे हिटलरला: एजे आणि लीलाच्या साखरपुड्यात येणार विघ्न; लीला शोधू शकेल का हरवलेली अंगठी?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2024 14:35 IST2024-04-22T14:35:00+5:302024-04-22T14:35:00+5:30
navri mile hitler la: साखरपुडा ऐन तोंडावर असतांनाच लीलाकडून मोठी चूक होणार आहे.

नवरी मिळे हिटलरला: एजे आणि लीलाच्या साखरपुड्यात येणार विघ्न; लीला शोधू शकेल का हरवलेली अंगठी?
छोट्या पडद्यावर अलिकडेच 'नवरी मिळे हिटलर'ला (navri mile hitler la) ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या मालिकेत अभिनेता राकेश बापट महत्त्वपूर्ण भूमिका साकारत असून त्याने बऱ्याच वर्षांनी मराठी मालिका विश्वात पदार्पण केलं आहे. त्यामुळे ही मालिका सध्या सोशल मीडियावर चर्चेत येत आहे. ही मालिका सुरु झाल्यापासून एजे आणि लीला यांच्यात मतभेद होतांना दिसत आहे. मात्र, असं असूनही ही जोडी लग्नाच्या बेडीत अडकली जाणार आहे.परंतु, यामध्येच लीलाकडून एक चूक होणार आहे.
रेवतीला विक्रांतच्या तावडीतून सोडवण्यासाठी लीला एजेची मदत घेते. त्याच्या बदल्यात एजे तिच्यासमोर लग्न करण्याची अट ठेवतो. त्यामुळे नाईलाजाने लीलाला तिच्यासोबत लग्न करावं लागणार आहे. यामध्येच एका कार्यक्रमात एजे लीलाची ओळख त्याची भावी पत्नी म्हणून करुन देतो. मात्र, लीलाला सासू म्हणून स्वीकारण्यास एजेच्या सुना तयार नाहीत. त्यामुळे त्या हे लग्न मोडायचा प्रयत्न करतात. यामध्येच आता एजेने लीलाला दिलेली अंगठी त्या पळवणार आहेत.
लवकरच या मालिकेत एजे आणि लीला यांचा साखरपुडा होणार आहे. त्यामुळे एजेने त्याची अत्यंत खास अंगठी लीलाकडे सांभाळायला दिली आहे. मात्र, ही अंगठी लीलाकडून हरवणार आहे. एजेच्या सुना दुर्गा, लक्ष्मी आणि सरस्वती या तिघी जणी लीलाला साखरपुड्याची साडी देण्यासाठी तिच्या घरी पोहोचतात आणि यावेळी संधीचा फायदा घेत एजेने लीलाला दिलेली अंगठी चोरतात.
दरम्यान, दुर्गा, लक्ष्मी, सरस्वती यांनी लीलाकडची अंगठी चोरल्यामुळे आता ऐन साखरपुड्याच्या दिवशी मोठा घोळ होणार आहे. त्यामुळे आता त्यांची ही चोरी एजे पकडू शकेल का? एजे-लीलाचा साखरपुडा होईल का? या प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना मालिका पाहिल्यावरच मिळणार आहेत.