गृहप्रवेश होताच जयश्रीने वसूकडे मागितलं वचन; वसू पूर्ण करु शकेल का सासूची इच्छा?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2024 18:03 IST2024-06-07T18:02:37+5:302024-06-07T18:03:31+5:30
Punha Kartavya Aahe : वसूच्या पहिल्या लग्नाचं सत्य येईल का आकाश समोर?

गृहप्रवेश होताच जयश्रीने वसूकडे मागितलं वचन; वसू पूर्ण करु शकेल का सासूची इच्छा?
छोट्या पडद्यावर गाजत असलेली मालिका म्हणजे पुन्हा कर्तव्य आहे. नुकताच या मालिकेत वसू आणि आकाश यांचा लग्नसोहळा पार पडला असून वसूने तिच्या सासरी गृहप्रवेश केला आहे. विशेष म्हणजे या घरात प्रवेश केल्यानंतर जयश्री पहिल्याच दिवशी वसूकडून एक वचन मागते आणि वसू सुद्धा ते वचन देते. इतकंच नाही तर आकाशसोबत मिळून ती एक महत्त्वाचा निर्णय सुद्घा घेते.
लग्नानंतर वसू आणि आकाश यांनी मुलांसाठी वेगवेगळ्या रुममध्ये त्यांच्या मुलांसोबत झोपण्याचा निर्णय घेतला आहे. तर, जयश्रीने वसूकडे आकाशचा संसार सुखी करण्याचं वचन मागितलं आहे. यामध्येच वसूने घरातल्यांपासून तिच्या पहिल्या नवऱ्याचं सत्य लपवलं आहे. त्यामुळे तिच्या मनाला सतत टोचणी लागली आहे.
दरम्यान, वसूच्या पहिल्या लग्नाचं सत्य घरातल्यासमोर येईल का? वसू तिचं सत्य आकाशला सांगू शकेल का? सत्य समोर आल्यानंतर काय असेल आकाश आणि घरातल्यांची प्रतिक्रिया या सगळ्यांची उत्तर प्रेक्षकांना मालिका पाहिल्यावर मिळणार आहेत.