रणजीतच्या 'या' निर्णयामुळे संजूला बसणार धक्का; अपूर्ण राहणार संजीवनीचं स्वप्न

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2021 05:36 PM2021-11-19T17:36:03+5:302021-11-19T17:36:46+5:30

Raja rani chi g jodi: या दोघांच्या नात्यातील गैरसमज, मतभेद दूर होऊन ही जोडी सुखाने नांदतांना दिसत आहे. विशेष म्हणजे आता रणजीतला त्याची वर्दी पुन्हा मिळावी यासाठी संजू प्रयत्न करत आहे.

marathi tv serial raja rani chi g jodi ranjeet make big decision | रणजीतच्या 'या' निर्णयामुळे संजूला बसणार धक्का; अपूर्ण राहणार संजीवनीचं स्वप्न

रणजीतच्या 'या' निर्णयामुळे संजूला बसणार धक्का; अपूर्ण राहणार संजीवनीचं स्वप्न

googlenewsNext

छोट्या पडद्यावर तुफान चर्चेत येत असलेली मालिका म्हणजे 'राजा रानीची गं जोडी'. पहिल्या भागापासून ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. ढालेपाटील कुटुंबातील रणजीत आणि संजीवनी यांच्या जीवनात आतापर्यंत अनेक चढउतार आल्याचं प्रेक्षकांनी पाहिलं आहे. नात्यातील प्रेम, दुरावा अशा अनेक गोष्टींना ही जोडी सामोरी गेली आहे. परंतु, आता या दोघांच्या नात्यातील गैरसमज, मतभेद दूर होऊन ही जोडी सुखाने नांदतांना दिसत आहे. विशेष म्हणजे आता रणजीतला त्याची वर्दी पुन्हा मिळावी यासाठी संजू प्रयत्न करत आहे. मात्र, रणजीत एक असा निर्णय घेणार आहे ज्यामुळे संजीवनीला मोठा धक्का बसणार आहे.

संजू अल्पवयाची असतानाच तिचं रणजीतसोबत लग्न करण्यात आलं होतं. त्यामुळे ढालेपाटील कुटुंबातील रणजीत, आईसाहेब आणि दादासाहेब यांना तुरुंगात शिक्षा भोगावी लागली होती. इतकंच नाही तर रणजीतला त्याची नोकरीदेखील गमवावी लागली होती. परंतु, आता रणजीतला त्याची नोकरी मिळावी यासाठी संजू प्रयत्न करत आहे.

दरम्यान, रणजीतला त्याची नोकरी परत मिळवायची असेल तर काही कागदपत्रांवर त्याची स्वाक्षरी असणं अत्यंत गरजेचं आहे. यासाठीच रणजीतची स्वाक्षरी घेण्यासाठी संजू प्रयत्न करते. मात्र, मी पुन्हा पोलीस फोर्स जॉइन करणार नाही असं रणजीत ठामपणे सांगतो. त्यामुळे संजूच्या पायाखालची जमीन सरकते. परंतु, रणजीत असा निर्णय का घेतो? हे येत्या भागातच प्रेक्षकांना कळणार आहे.
 

Web Title: marathi tv serial raja rani chi g jodi ranjeet make big decision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.