Video: बऱ्याच वर्षानंतर होणार दिपा-कार्तिकची भेट; झालेले गैरसमज होतील का दूर?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2021 13:37 IST2021-11-12T13:36:24+5:302021-11-12T13:37:30+5:30
Rang majha wegla : या व्हिडीओमध्ये कार्तिक आणि दिपा बऱ्याच वर्षांनंतर एकमेकांच्या समोर येणार आहेत. विशेष म्हणजे एकमेकांना पाहिल्यानंतर दोघांच्याही मनातील प्रेमभाव दाटून येणार आहे.

Video: बऱ्याच वर्षानंतर होणार दिपा-कार्तिकची भेट; झालेले गैरसमज होतील का दूर?
छोट्या पडद्यावर तुफान गाजलेली मालिका म्हणजे रंग माझा वेगळा. अल्पावधीत प्रेक्षकांची मनं जिंकणारी ही मालिका सध्या रंगतदार वळणावर आली आहे. कार्तिकी आणि दीपिका यांच्या जन्मानंतर विभक्त झालेले कार्तिक-दिपा लवकरच एकमेकांसमोर येणार आहेत. त्यामुळे या मालिकेत आता पुन्हा एक नवा ट्विस्ट घडणार असल्याचं पाहायला मिळत आहे.
स्टार प्रवाहने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये कार्तिक आणि दिपा बऱ्याच वर्षांनंतर एकमेकांच्या समोर येणार आहेत. विशेष म्हणजे एकमेकांना पाहिल्यानंतर दोघांच्याही मनातील प्रेमभाव दाटून येणार आहे. त्यामुळे आता हे दोघं सगळं विसरुन परत एकत्र येणार का? असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी दिवाळीच्या मुहूर्तावर सौंदर्या इनामदार आणि दिपा यांची भेट झाली होती. त्यावेळी दिपा पुन्हा इनामदारांच्या घरी जाणार अशी शक्यता निर्माण झाली होती. परंतु, तसं काहीच घडलं नाही. त्यानंतर आता कार्तिकी आणि दीपिका यांच्या शाळेच्या निमित्ताने दिपा-कार्तिकची भेट झाली आहे. त्यामुळे या मालिकेत आता पुढे काय होणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.