रंग माझा वेगळा: कार्तिकसाठी दिपा करणार वटपौर्णिमेचा उपवास; सुरु होणार नव्या नात्याची सुरुवात?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2022 04:06 PM2022-06-10T16:06:03+5:302022-06-10T16:06:29+5:30

Rang maza wegla: सोशल मीडियावर या मालिकेचा एक प्रोमो व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये दिपा कार्तिकसाठी वडाच्या झाडाची पूजा करताना दिसत आहे.

marathi tv serial Rang maza wegla kartik deepa vatpurnima | रंग माझा वेगळा: कार्तिकसाठी दिपा करणार वटपौर्णिमेचा उपवास; सुरु होणार नव्या नात्याची सुरुवात?

रंग माझा वेगळा: कार्तिकसाठी दिपा करणार वटपौर्णिमेचा उपवास; सुरु होणार नव्या नात्याची सुरुवात?

googlenewsNext

छोट्या पडद्यावरील अल्पावधीत लोकप्रिय झालेली मालिका म्हणजे 'रंग माझा वेगळा' (rang maza wegla). आतापर्यंत या मालिकेत आलेल्या अनेक चढउतारांमुळे ही मालिका दिवसेंदिवस लोकप्रिय झाली. यात दिपा आणि कार्तिक या जोडीवर प्रेक्षकांना भरभरुन प्रेम केलं.  गैरसमजामुळे एकमेकांपासून दूर झालेली कार्तिक-दिपा त्यांच्या मुलींमुळे जवळ येताना दिसत आहेत. परंतु, मनात एकमेकांप्रती प्रेम असूनही ते नातं मान्य करायला तयार नाहीत. यामध्येच आता दिपा, कार्तिकसाठी वटपौर्णिमेचा उपवास करणार असून वडाची पूजादेखील करणार आहे.

सध्या या मालिकेत एक रंजक वळण आल्याचं पाहायला मिळत आहे. कार्तिकीला, दिपा आणि कार्तिकचं सत्य समजलं आहे. कार्तिकच आपले खरे वडील असल्याचं लक्षात आल्यानंतर ती दिपासोबत वाद घालते. त्यामुळे घरातून बाहेर पडलेल्या दिपाच्या डोक्यात सतत कार्तिकचे विचार असतात. यामध्येच काही कारणास्तव संकटात सापडलेल्या कार्तिकची सुखरुपपणे सुटका व्हावी यासाठी दिपा त्याच्यासाठी उपवास करते. 

सोशल मीडियावर या मालिकेचा एक प्रोमो व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये दिपा कार्तिकसाठी वडाच्या झाडाची पूजा करताना दिसत आहे. तसंच आयशाने कार्तिक विरोधात तक्रार केल्यामुळे या संकटातून तो बाहेर पडावा यासाठी ती देवाकडे प्रार्थनाही करत आहे. त्यामुळे दिपाने कार्तिकसाठी केलेल्या उपवासाचं फळ तिला मिळेल का?  कार्तिकची सुखरुपपणे सुटका होईल का? या प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना मालिका पाहिल्यावरच मिळणार आहे.

Web Title: marathi tv serial Rang maza wegla kartik deepa vatpurnima

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.