'सुख म्हणजे नक्की काय असतं'फेम अभिनेत्रीच्या आईचं निधन; पोस्ट शेअर करत दिली माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2022 15:46 IST2022-02-09T15:45:39+5:302022-02-09T15:46:19+5:30
Sukh mhanje nakki kay asata: या अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत ही दु:खद माहिती चाहत्यांसोबत शेअर केली आहे. तसंच एक भावनिक पोस्टही लिहिली आहे.

'सुख म्हणजे नक्की काय असतं'फेम अभिनेत्रीच्या आईचं निधन; पोस्ट शेअर करत दिली माहिती
छोट्या पडद्यावर गाजत असलेल्या 'सुख म्हणजे नक्की काय असतं' या मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्रीच्या आईचं निधन झालं आहे. या अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत ही दु:खद माहिती चाहत्यांसोबत शेअर केली आहे. तसंच एक भावनिक पोस्टही लिहिली आहे.
'सुख म्हणजे नक्की काय असतं' या मालिकेतील गौरीची अम्मा म्हणजेच ज्येष्ठ अभिनेत्री आशा ज्ञाते(Asha Dnyate ) यांच्या आईचं निधन झालं आहे. ८ फेब्रुवारी रोजी त्यांच्या आईने वयाच्या ९४ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. ही दु:खद माहिती आशा ज्ञाते यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे.
"अखेरचा श्वास घेऊन....निरोप घेतला आईने.....94 वर्षे....8/2/2022.आज पोरकी झाले..... आई नाही तर काहीच नाही.....घे जन्म तू फिरोनी, येईन मी ही पोटी खोटी ठरो न देवा, ही एक आस मोठी.... आsssssssई....."अशी पोस्ट आशा ज्ञाते यांनी शेअर केली आहे. ही पोस्ट पाहिल्यावर कलाविश्वातील अनेकांनी त्यांच्या आईला आदरांजली अर्पण केली आहे.
कोण आहे आशा ज्ञाते?
'सुख म्हणजे नक्की काय असतं' या मालिकेत अम्माची भूमिका साकारुन घराघरात पोहोचलेल्या आशा यांनी अनेक गाजलेल्या चित्रपट, मालिकांमध्ये काम केलं आहे. 'रामा आत्मारामा','नारी झाल्या भारी' अशा अनेक नाटकांमध्ये त्यांनी काम केलं आहे.