शालिनीचा नाटक लवकरच होणार उघड; घरातल्यांसमोर गौरी आणणार सत्य?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2022 14:51 IST2022-01-04T14:50:39+5:302022-01-04T14:51:15+5:30
Sukh mhanje nakki kay asta: गौरी आणि जयदीपचं लग्न झाल्यापासून शालिनी वहिनीवर मानसिक आघात झाल्याचं पाहायला मिळालं.

शालिनीचा नाटक लवकरच होणार उघड; घरातल्यांसमोर गौरी आणणार सत्य?
छोट्या पडद्यावरील 'सुख म्हणजे नक्की काय असतं !' या मालिकेने अल्पावधीत प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आहेत. त्यामुळे या मालिकेचा प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. त्यातच गेल्या काही दिवसांपासून गौरीच्या आयुष्यात अनेक घडामोडी घडत आहेत. त्यामुळे ही मालिका दिवसेंदिवस रंजक वळणावर येत असल्याचं पाहायला मिळतंय. गौरी आणि जयदीपचं लग्न झाल्यापासून शालिनी वहिनीवर मानसिक आघात झाल्याचं पाहायला मिळालं. परंतु, शालिनी खरंच वेडी नसून तिने ते केवळ नाटक रचल्याचं समोर येणार आहे. विशेष म्हणजे गौरीच शालिनीचा पर्दाफाश करणार आहे.
स्टार प्रवाहने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर या मालिकेचा एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये शालिनी तिचं खरं रुप दाखवणार आहे. विशेष म्हणजे तिचं अचानकपणे बदलेलं वागणं पाहून गौरी थक्क होणार आहे.
व्हायरल होत असलेल्या या प्रोमोमध्ये गौरी आणि शालिनी जंगलातून जात असतात. यावेळी दोन गुंड त्यांची वाट आडवून त्यांची छेड काढतात. यावेळी शालिनी तिचं खरं रुप दाखवते आणि या गुंडांना चांगलाच धडा शिकवते. लेचीपेची समजू नगं, पैलवानाची बायको हाय मी, असं म्हणत शालिनी या गुंडांना मारते. परंतु, शालिनीचं हे रुप पाहून तिचं सत्य गौरी समोर येतं.
दरम्यान, आता गौरीला शालिनीचं सत्य समजल्यानंतर ती कोणता निर्णय घेईल? पुन्हा ती शिर्के-पाटील कुटुंबाला या खोट्या नाटकाबद्दल सांगेल का? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. परंतु, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना येत्या भागातच मिळणार आहेत.