ठिपक्यांची रांगोळी घेणार प्रेक्षकांचा निरोप; ज्ञानदाने शेअर केला सेटवरचा शेवटचा व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2023 13:40 IST2023-11-08T13:39:36+5:302023-11-08T13:40:53+5:30
Thipkyanchi Rangoli: लिका संपणार असल्याचं लक्षात येताच प्रेक्षकांमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे.

ठिपक्यांची रांगोळी घेणार प्रेक्षकांचा निरोप; ज्ञानदाने शेअर केला सेटवरचा शेवटचा व्हिडीओ
छोट्या पडद्यावर सध्या गाजत असलेली मालिका म्हणजे ठिपक्यांची रांगोळी. अल्पावधीत या मालिकेने प्रेक्षकांना आपलंसं केलं आहे. त्यामुळे या मालिकेतील प्रत्येक कलाकार प्रेक्षकांना आपलासा वाटतो. परंतु, आता लवकरच ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. नुकताच या मालिकेचा अखेरचा सीन शूट झाला असून अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकरने मालिकेच्या सेटवरील लास्ट व्हिडीओ शेअर केला आहे.
ज्ञानदाने नुकताच सोशल मीडियावर या मालिकेच्या मेकअप रुममधील एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिच्यासोबत सुमीदेखील दिसून येत आहे. व्हिडीओ शेअर करत ज्ञानदानेच हा आमचा मालिकेच्या सेटवरील शेवटचा व्हिडीओ असल्याचं सांगितलं आहे.
'हे आज आमचं शेवटचं गुड मॉर्निंग असेल ठिपक्यांची रांगोळीच्या सेटवरचं', असं ज्ञानदाने यात म्हटलं आहे. सोबतच तिच्या मेकअप रुमची झलकदेखील दाखवली आहे.
दरम्यान, या मालिकेतील माई, अपूर्वा,शशांक, सुमी या कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनावर गारुड घातलं. ही मालिका सुरु झाल्यापासून ती लोकप्रियतेमध्ये पुढे आहे. त्यामुळे आता ही मालिका संपणार असल्याचं लक्षात येताच प्रेक्षकांमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे.