अक्षरा-अधिपती होणार एक; अखेर थाटात पार पडणार साखरपुडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2023 18:54 IST2023-08-31T18:54:05+5:302023-08-31T18:54:41+5:30
Tula Shikvin Changlach Dhada: येत्या ४ सप्टेंबर रोजी या मालिकेच अक्षरा-अधिपती यांच्या साखरपुड्याचा विशेष भाग रंगणार आहे.

अक्षरा-अधिपती होणार एक; अखेर थाटात पार पडणार साखरपुडा
छोट्या पडद्यावर सध्या गाजत असलेली मालिका म्हणजे 'तुला शिकवीन चांगलाच धडा'(Tula Shikvin Changlach Dhada) . ही मालिका सुरु झाल्यापासून लोकप्रिय ठरली आहे. अक्षराचा साधा पण तितकाच करारी स्वभाव आणि अधिपतीचा रांगडा पण तितकाच प्रेमळ स्वभाव यामुळे त्यामुळेही जोडी अल्पावधीत लोकप्रिय झाली. सुरुवातीला एकमेकांचे मित्र असलेले अक्षरा आणि शिवानी लवकरच लग्नगाठ बांधणार आहेत. त्या दिशेने त्यांची सुरुवातही झाली आहे.
लवकरच या मालिकेत अक्षरा आणि अधिपती यांचा साखरपुडा पाहायला मिळणार आहे. येत्या ४ सप्टेंबर रोजी या मालिकेच अक्षरा-अधिपती यांच्या साखरपुड्याचा विशेष भाग रंगणार आहे.
शाळेत सर्व शिक्षक आणि विद्यार्थी अक्षराला अभिनंदन करतात व अगदी आनंदाने शुभेच्छा देतात. शाळेत सुरु असलेला हा प्रकार पाहून अक्षरा गोंधळून जाते. नंतर भुवनेश्वरी शाळेत येऊन अक्षराला ४ तारखेला तिचा आणि अधिपतीचा धुमधडाक्यात साखरपुडा होणार अशी घोषणा करते, अक्षरा हे सगळं बघून थक्क होते. आता या साखरपुडा विशेष सप्ताह भागांमध्ये काय धमाल घडणार. काय असणार भुवनेश्वरीचा नवीन डाव? हे मालिका पाहिल्यावरच प्रेक्षकांना कळणार आहे.