अखेर अक्षरा-भुवनेश्वरीमध्ये पडणार वादाची ठिणगी; सासू-सून येणार आमनेसामने

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2023 06:47 PM2023-11-28T18:47:42+5:302023-11-28T18:49:05+5:30

Tula shikvin changlach dhada: अधिपती कोणाची घेईल बाजू आईची की बायकोची?

marathi tv serial tula shikvin changlach dhada news twest | अखेर अक्षरा-भुवनेश्वरीमध्ये पडणार वादाची ठिणगी; सासू-सून येणार आमनेसामने

अखेर अक्षरा-भुवनेश्वरीमध्ये पडणार वादाची ठिणगी; सासू-सून येणार आमनेसामने

झी मराठीवरील 'तुला शिकवीन चांगलाच धडा' या मालिकेची सध्या प्रेक्षकांमध्ये चांगलीच चर्चा होत आहे. अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या या मालिकेत येत असलेल्या रंजक वळणांमुळे ही मालिका दिवसेंदिवस लोकप्रिय होत आहे.  भुवनेश्वरीआणि अक्षरा यांच्या नात्यात अनेक ट्विस्ट येत आहेत. यामध्येच आता या दोघींमध्ये अडून-अडून सुरु असलेलं युद्ध थांबणार आहे आणि त्या एकमेकींच्या समोरासमोर येणार आहेत.

नुकतंच 'सारं काही तिच्यासाठी' आणि 'तुला शिकवीन चांगलाच धडा' या दोन मालिकांचे महासंगम विशेष भाग पार पडले. त्यात भुवनेश्वरी अधिपतीला कोकणात जमिनीच्या व्यवहारसाठी पाठवते. पण, भुवनेश्वरीला हे माहिती नाही की हा व्यवहार तिला एका मोठ्या संकटात टाकणार आहे. अक्षराची भेट रघुनाथरावांशी होते आणि रघुनाथकाकांच्या मदतीने ती चारुहाससरांवर म्हणजेच अधिपतीच्या वडिलांवर आयुर्वेदिक औषधी उपचार सुरु करते. 

चारुहाससरांवर उपचार सुरु असताना अक्षराला एक मोठ गुपित कळतं आणि अक्षरा त्याचा शोध घेण्याचं ठरवते. त्यामुळे सध्या अक्षराने दोन गोष्टींचा ध्यास घेतला आहे. त्यातली एक गोष्ट म्हणजे अधिपतीला शिक्षित करणं आणि दुसरी गोष्ट म्हणजे चारुहास सरांवर कोणती व्यक्ती चुकीचे उपचार करतीये तिचा शोध घेणं.  परंतु, अक्षरा या दोन्ही गोष्टी लपून करत आहे.

दरम्यान, अक्षरा नेमकं काय करतीये हे भुवनेश्वरीला कळलं तर काय होईल? अक्षरा भुवनेश्वरीचा सामना कसा करेल? अधिपती आईला सोडून अक्षराची साथ देईल का? असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. मात्र, येत्या काळात लवकरच भुवनेश्वरी आणि अक्षराचा एकमेकांशी सामना होणार आहे. त्यामुळे या मालिकेत पुढे काय घडतं हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Web Title: marathi tv serial tula shikvin changlach dhada news twest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.