Video: '...आणि मग वाट लागते'; नेमका काय अर्थ आहे पूर्वा शिंदेच्या पोस्टचा?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2024 12:22 IST2024-06-13T12:21:44+5:302024-06-13T12:22:17+5:30
Purva shinde: पूर्वा कायम नवनवीन पोस्ट चाहत्यांसोबत शेअर करत असते. यात नुकताच तिने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओला तिने दिलेलं कॅप्शन चर्चेचा विषय ठरलं आहे.

Video: '...आणि मग वाट लागते'; नेमका काय अर्थ आहे पूर्वा शिंदेच्या पोस्टचा?
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे पूर्वा शिंदे. उत्तम अभिनय कौशल्याच्या जोरावर तिने फार कमी कालावधीत इंडस्ट्रीत तिचं हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. सध्या ती पारु या झी मराठीवरील मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे. पूर्वा सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे. त्यामुळे ती वरचेवर चाहत्यांच्या भेटीला येत असते.
पूर्वा कायम नवनवीन पोस्ट चाहत्यांसोबत शेअर करत असते. यात नुकताच तिने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये ती बिनधास्तपणे नाचत आहे. विशेष म्हणजे या व्हिडीओला तिने दिलेलं कॅप्शन चर्चेत आहे. पूर्वाने सोनू निगमच्या 'इश्क विश्क प्यार व्यार' या गाण्यावर व्हिडीओ शेअर केला आहे.
दरम्यान, 'और फिर वाट लग जाती हैं', असं कॅप्शन तिने या व्हिडीओला दिलं आहे. तिच्या या पोस्टवर नेटकरी कमेंटचा पाऊस पाडत आहेत. विशेष म्हणजे तिचा हा व्हिडीओ अल्पावधीत लोकप्रिय झाला आहे.