आई कुठे काय करते: अनिरुद्धपुढे होणार आशुतोषचा पराभव; इशा ठरणार कारणीभूत
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2021 16:15 IST2021-12-22T16:15:00+5:302021-12-22T16:15:00+5:30
Aai kuthe kay karte: घरातले सगळे सदस्य विरंगुळा म्हणून एक छान खेळ खेळतात. या खेळात आशुतोष आणि अनिरुद्ध एकमेकांसमोर प्रतिस्पर्धी म्हणून उभे राहतात.

आई कुठे काय करते: अनिरुद्धपुढे होणार आशुतोषचा पराभव; इशा ठरणार कारणीभूत
छोट्या पडद्यावर गाजत असलेल्या 'आई कुठे काय करते' या मालिकेत सध्या अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत. एकीकडे अभिचं लग्न ठरलं आहे. त्यामुळे घरात लगीनघाई सुरु झाली आहे. तर, दुसरीकडे अरुंधती एक-एक पावलं टाकत तिचं करिअर घडवत आहे. त्यामुळे या मालिकेत सध्या रंजक वळणं येत असल्याचं पाहायला मिळत आहे. यामध्येच अनिरुद्धला आशुतोष फारसा आवडत नसल्यामुळे तो सतत त्याचा अपमान करायचा प्रयत्न करतो. परंतु, आशुतोष मात्र, या सगळ्याकडे हसत हसत दुर्लक्ष करतो. यामध्येच आता आशुतोष इशासाठी अनिरुद्ध समोर पराभूत होणार आहे.
स्टार प्रवाहने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर या मालिकेचा एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये इशाचं मन राखण्यासाठी आणि एका मुलीच्या नजरेत बाप पडू नये यासाठी आशुतोष पराभव पत्करणार आहे.
सध्या घरात अभिच्या लग्नाची धामधूम सुरु आहे. त्यामुळे घरात सगळे नातेवाईक, मित्रमंडळी जमली आहेत. यामध्येच घरातले सगळे सदस्य विरंगुळा म्हणून एक छान खेळ खेळतात. या खेळात आशुतोष आणि अनिरुद्ध एकमेकांसमोर प्रतिस्पर्धी म्हणून उभे राहतात. विशेष म्हणजे या खेळात आशुतोष जिंकतो. मात्र, इशासाठी तो हरला असं दाखवतो.
या खेळामध्ये एका गोल रिंगणामध्ये रुमाल टाकलेला असतो. त्या रुमाला भोवती दोन स्पर्धक उभे असून तो रुमाल जो स्पर्धक आधी उचलेलं तो विजयी होणार. यात अनिरुद्ध आणि आशुतोष प्रतिस्पर्धी म्हणून उभे राहतात. यावेळी अनिरुद्ध आशुतोषसोबत खोचकपणे बोलत असतो. परंतु, आशुतोष दरवेळीप्रमाणे त्याला शांत उत्तर देतो.
दरम्यान,याच वेळी इशा अनिरुद्धला प्रोत्साहन करण्यासाठी जोरजोरात ओरडते. ज्यामुळे त्याच लक्ष इशाकडे जात आणि आशुतोष पटकन रिंगणातून तो रुमाल उचलतो. परंतु, आपले वडील जिंकावेत यासाठी इशा ज्या पद्धतीने अनिरुद्धला चिअर अप करत असते. ते पाहून तिचा हिरमोड होऊ नये यासाठी आशुतोष हातातील रुमाल खाली टाकतो आणि तो अनिरुद्धला घेऊ देतो. त्यामुळे आशुतोष फक्त इशासाठी ही हार पत्करतो हे दिसून येतं.