'Bigg Boss 3'च्या घरात होणार सिद्धार्थ जाधवची एण्ट्री?; सेटवरील व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2021 03:31 PM2021-09-19T15:31:03+5:302021-09-19T15:33:45+5:30
Bigg Boss 3: सध्या बिग बॉसच्या सेटवरील सिद्धार्थ जाधवचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांना प्रश्न पडले आहेत.
छोट्या पडद्यावरील वादग्रस्त पण तितकाच चर्चेत राहणारा कार्यक्रम म्हणजे 'बिग बॉस'. यंदा या शोचं तिसरं पर्व रंगणार आहे. त्यामुळे या शोविषयी प्रत्येक गोष्ट जाणून घेण्याची प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. आज (१९ सप्टेंबर) संध्याकाळी या शोचा ग्रँड प्रिमियर रंगणार आहे. मात्र, प्रेक्षकांची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. त्यामुळेच या शोमध्ये नेमके कोणते सेलिब्रिटी झळकणार हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक कमालीचा प्रयत्न करत आहेत. त्यातच सध्या बिग बॉसच्या सेटवरील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर कलाविश्वातील एक दिग्गज अभिनेता यंदाच्या पर्वात सहभागी होतो की काय असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये मराठी कलाविश्वातील एक लोकप्रिय अभिनेता वेगाने बिग बॉसच्या सेटकडे जाताना दिसत आहे. त्यामुळे त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहून आता प्रेक्षकांना अनेक प्रश्न पडले आहेत.
Bigg Boss Marathi 3: आजपासून सुरु होणार बिग बॉस मराठीचा धमाका; असं असेल यंदाचं पर्व
विशेष म्हणजे बिग बॉसच्या सेटकडे वेगाने जाणारा हा अभिनेता दुसरा-तिसरा कोणी नसून प्रेक्षकांचा लाडका अभिनेता सिद्धार्थ जाधव आहे. त्यामुळे आता यंदाच्या पर्वात चक्क सिद्धार्थ जाधव सहभागी होणार की काय असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे.
दरम्यान, बिग बॉसच्या सेटवर जरी सिद्धार्थ दिसत असला तरीदेखील तो यंदाच्या पर्वात नेमका सहभागी होणार की नाही?, तो या सेटवर नेमकं काय करतोय?, या सगळ्याची उत्तरं प्रेक्षकांना आज संध्याकाळी ७ नंतरच मिळणार आहेत.