'या' व्यक्तीच्या आठवणीत दादूस व्याकूळ; इमोशनल करणारा Video व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2021 05:30 PM2021-11-18T17:30:00+5:302021-11-18T17:30:00+5:30
Bigg boss marathi: प्रत्येकाशी आदराने बोलणारे दादूस आज घरातील सदस्यांसोबतच प्रेक्षकांचेही लाडके स्पर्धक झाले आहेत. परंतु, सध्या दादूस एका खास व्यक्तीच्या आठवणींमध्ये व्याकूळ झाले आहेत.
बिग बॉस (bigg boss) या शोमध्ये स्पर्धक कायमच भांडण, राडे, वादविवाद यामुळे चर्चेत येत असतात. परंतु, पहिल्यांदाच बिग बॉस मराठीच्या (bigg boss marathi) घरात अशा व्यक्तीने एन्ट्री घेतली आहे, जी वादविवादापेक्षा त्यांच्यातील समजूतदारपणामुळे चर्चेत येतीये. ही व्यक्ती म्हणजे दुसरी-तिसरी कोणी नसून दादूस आहे. प्रत्येकाशी आदराने बोलणारे दादूस आज घरातील सदस्यांसोबतच प्रेक्षकांचेही लाडके स्पर्धक झाले आहेत. परंतु, सध्या दादूस (dadus) एका खास व्यक्तीच्या आठवणींमध्ये व्याकूळ झाले आहेत. त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
बिग बॉसच्या घरात प्रत्येकाशी आदराने वागणारे दादूस सध्या तृप्ती देसाई (trupti desai) यांच्या आठवणींमध्ये व्याकूळ झाले आहेत. बिग बॉसच्या घरात दादूस आणि तृप्ती देसाई यांच्यात छान मैत्री झाली होती. त्यामुळे दादूस तृप्ती देसाईंना ताई मानत होते. अलिकडेच तृप्ती देसाई बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्या. मात्र, आजही घरातील प्रत्येक स्पर्धकाला त्यांची आठवण येत आहे. याच आठवणींमध्ये दादूसच्या डोळ्यात पाणी आल्याचं पाहायला मिळालं.
"तृप्ती मॅडमना आज मिस करतोय.आठवण येते मला", असं दादूस म्हणाले. त्यावर "आताच आम्ही त्यांचं नाव काढलं. त्या बाहेरुन पाहत असतील आपल्याला", असं सोनाली आणि स्नेहा म्हणाल्या. त्यानंतर दादूसने कॅमेरात पाहून "तृप्ती मॅडम मिस यू. आम्ही सगळे जण तुम्हाला मिस करतोय", असं म्हटलं.
दरम्यान, तृप्ती देसाई जरी बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्या असल्या तरीदेखील त्या म्हणाल्या प्रमाणे त्यांनी सगळ्यांची मनं जिंकली आहेत. त्यामुळेच आज घरातील प्रत्येक स्पर्धक त्यांना मिस करताना दिसत आहे.