Bigg boss marathi: टीम B मध्ये पडणार फूट ! सगळ्यांच्या वाटा होणार वेगळ्या?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2021 02:00 PM2021-12-15T14:00:00+5:302021-12-15T14:00:00+5:30
Bigg boss marathi: सध्या घरामध्ये 'टिकीट टू फिनाले'साठीचा टास्क रंगत असून अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी प्रत्येक स्पर्धक जीव तोडून मेहनत करत आहे.
छोट्या पडद्यावरील वादग्रस्त पण तितकाच चर्चिला जाणारा शो म्हणजे बिग बॉस मराठी (bigg boss marathi). सध्या या शोचं तिसरं पर्व सुरु असून गेल्या २ महिन्यांपासून या घरातील स्पर्धक एकमेकांसोबत राहत आहेत. विशेष म्हणजे सुरुवातीच्या काळात एकमेकांचे चांगले मित्र असलेले हे सदस्य आता प्रतिस्पर्धी म्हणून एकमेकांकडे पाहू लागले आहेत. त्यामुळे या घरात दररोज वादविवाद रंगतांना पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे डे वन पासून एकत्र कुटुंबाप्रमाणे राहिलेल्या टीम B मध्ये आता फूट पडली आहे.
सध्या घरामध्ये 'टिकीट टू फिनाले'साठीचा टास्क रंगत असून अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी प्रत्येक स्पर्धक जीव तोडून मेहनत करत आहे. विशेष म्हणजे हा खेळ आणि टिकीट टू फिनालेचा टास्क सुरु होईपर्यंत टीम B कायम एकमेकांसोबत होते. परंतु, हा टास्क सुरु झाल्यापासून या टीममधील मीनल, सोनाली, विशाल आणि विकास यांच्यातील मैत्रीची जागा प्रतिस्पर्धकांनी घेतली आहे.
अलिकडेच मीनल आणि विकासमध्ये टास्कवरुन जोरदार भांडण झाल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर आता विशाल आणि विकास याच मुद्द्यावरुन चर्चा करतांना दिसणार आहेत. मात्र, या चर्चांमधून टीम B मध्ये फूट पडल्याचं स्पष्टपणे दिसून येत आहे.
"एवढं मनापासून मी या लोकांसाठी खेळले. मी एकटी काय survive नाही करू शकतं?", असा प्रश्न मीनल घरातल्यांना विचारते. तिच्या या वाक्यावरुन ''या घरात प्रत्येकजण एकटं survive करू शकतं... आणि आपल्या ग्रुपमध्ये करुचं शकतं", असं विकास विशालला सांगतो.
दरम्यान, "माझ्यामुळे त्यांचा फायदा झाला", असं मीनल म्हणते. त्यावर मात्र, विशाल प्रतिक्रिया देतो. "प्रत्येकाने केले पण तू बोलून दाखवलं याला काही अर्थ नाही. कशाला मग ग्रुप ग्रुपचं नाटकं करायचे...". आता टीम B मध्ये निर्माण झालेला हा वाद कुठपर्यंत जाणार? यांच्यातील एकी तुटणार का? या प्रश्नांची उत्तर येत्या भागात प्रेक्षकांना मिळणार आहेत.