Bigg boss marathi 3: Shocking!! बिग बॉसच्या घरातून सोनाली पाटील बाहेर?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2021 10:15 AM2021-12-19T10:15:44+5:302021-12-19T10:16:45+5:30

Bgg boss marathi 3: 'बिग बॉस'ची ट्रॉफी जिंकण्यासाठी अवघे काही दिवस बाकी असतानाच सोनालीला प्रेक्षकांचा निरोप घ्यावा लागणार आहे.

marathi tv show bigg boss marathi 3 sonali patil eviction | Bigg boss marathi 3: Shocking!! बिग बॉसच्या घरातून सोनाली पाटील बाहेर?

Bigg boss marathi 3: Shocking!! बिग बॉसच्या घरातून सोनाली पाटील बाहेर?

googlenewsNext

छोट्या पडद्यावर सध्या तुफान गाजत असलेला शो म्हणजे बिग बॉस मराठी (bigg boss marathi). यंदा या शोचं तिसरं पर्व सुरु असून आता या घरात शेवटचे ७ स्पर्धक राहिले आहेत. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून हा शो सातत्याने चर्चेत येत आहे. या संपूर्ण शोमध्ये अनेक घडामोडी घडत आहेत. अलिकडेच सूत्रसंचालक महेश मांजरेकर (mahesh manjarekar) यांनी प्रकृतीचं कारण देत हा शो सोडला. त्यामुळे आता अभिनेता सिद्धार्थ जाधव (siddharth jadhav) नव्या सूत्रसंचालकांच्या रुपात पाहायला मिळत आहे. त्यामध्येच विशाल निकम (vishal nikam) हा ग्रँड फिनालेमध्ये जाणारा फर्स्ट फायनलिस्ट ठरला आहे. परंतु, आता विशालला एक धक्का बसणार आहे. विशालची या घरातली सर्वात चांगली मैत्रीण सोनाली पाटील (sonali patil)  हिला हा गेम अर्ध्यावरच सोडावा लागणार आहे.

marathiserials_official या इन्स्टाग्राम पेजवर एक पोस्ट करण्यात आली आहे. यामध्ये आज बिग बॉसच्या घरातून सोनाली पाटील बाहेर पडणार असल्याचं सांगण्यात येत आहे. तसंच आजच्या बिग बॉसच्या चावडीवर अभिनेता अंकुश चौधरी हजेरी लावणार आहे.

दरम्यान, 'बिग बॉस'ची ट्रॉफी जिंकण्यासाठी अवघे काही दिवस बाकी असतानाच सोनालीला प्रेक्षकांचा निरोप घ्यावा लागणार आहे. त्यामुळे ही पोस्ट पाहिल्यावर नेटकऱ्यांनी विविध कमेंट्स केल्या आहेत. सोनाली या घरातून बाहेर पडल्यावर आता विशाल, विकास, जय, उत्कर्ष, मीरा आणि मीनल हे सहा स्पर्धक राहणार आहेत. परंतु, आता खरंच सोनालीला या घरातून निरोप घ्यावा लागणार का? हे येत्या भागातच प्रेक्षकांना कळणार आहे.
 

Web Title: marathi tv show bigg boss marathi 3 sonali patil eviction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.