Video : 'ओ भाऊ जरा चावडीवर या'; 'बिग बॉस'चं धमाकेदार टायटल सॉन्ग ऐकलं का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2021 18:54 IST2021-09-19T18:52:25+5:302021-09-19T18:54:57+5:30
Bigg boss marathi 3: 'ओ भाऊ जरा चावडीवर' या असे या टायटल साँगचे बोल असून त्यात महेश मांजरेकरांचा हटके अंदाज पाहायला मिळत आहे.

Video : 'ओ भाऊ जरा चावडीवर या'; 'बिग बॉस'चं धमाकेदार टायटल सॉन्ग ऐकलं का?
गेल्या दोन वर्षांपासून अख्ख्या महाराष्ट्राला ज्या कार्यक्रमाची उत्सुकता लागली होती. त्या 'बिग बॉस मराठी'च्या तिसऱ्या पर्वाला अखेर आजपासून (१९ सप्टेंबर) सुरुवात होणार आहे. प्रत्येक पर्वाप्रमाणे याही पर्वात 'बिग बॉस'च्या घरात दिग्दर्शक, अभिनेता आणि सूत्रसंचालक महेश मांजरेकर यांचा आवाज घुमणार आहे. त्यापूर्वी 'बिग बॉस'चं धमाकेदार टायटल साँग प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.
कलर्स मराठीने नुकतंच त्यांच्या इन्स्टाग्राम पेजवर 'बिग बॉस मराठी ३'चं टायटल साँग रिलीज केलं आहे. विशेष म्हणजे उडत्या चालीत शूट केलेलं हे टायटल साँग प्रेक्षकांच्या चांगलंच पसंतीत उतरत आहे.
'ओ भाऊ जरा चावडीवर' या असे या टायटल साँगचे बोल असून त्यात महेश मांजरेकरांचा हटके अंदाज पाहायला मिळत आहे. वैभव जोशी यांनी शब्दबद्ध केलेल्या या टायटल साँगला पद्मनाभ गायकवाड, राहुल सुहास आणि महेश मांजरेकर यांचा स्वरसाज लाभलेला आहे. तसंच या गाण्याची निर्मिती आणि संगीत हितेश मोडक यांचं आहे.