Bigg boss marathi: बिग बॉसने केली मोठी घोषणा; 'उत्कर्ष ठरला ऑल राऊंडर खेळाडू'
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2021 17:14 IST2021-12-21T17:13:40+5:302021-12-21T17:14:17+5:30
Bigg boss marathi: या घरात शेवटचे सहा स्पर्धक राहिले आहेत. त्यामुळे प्रत्येकामध्येच एक चढाओढ लागली आहे. यामध्येच बिग बॉसने एक मोठी घोषणा केली आहे.

Bigg boss marathi: बिग बॉसने केली मोठी घोषणा; 'उत्कर्ष ठरला ऑल राऊंडर खेळाडू'
छोट्या पडद्यावरील वादग्रस्त शो 'बिग बॉस मराठी'(bigg boss marathi) लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. अवघ्या काही दिवसांवर या शोचा ग्रँड फिनाले येऊन ठेपला आहे. त्यामुळे यंदाच्या पर्वाचा विजेता किंवा विजेती कोण ठरणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. सध्या या घरात, मीनल, मीरा, जय, उत्कर्ष, विकास आणि विशाल हे शेवटचे सहा स्पर्धक राहिले आहेत. त्यामुळे प्रत्येकामध्येच एक चढाओढ लागली आहे. यामध्येच बिग बॉसने एक मोठी घोषणा केली आहे.
कलर्स मराठीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये बिग बॉस उत्कर्षसंदर्भात (utkarsh shinde) एक मोठी घोषणा करताना दिसत आहे. विशेष म्हणजे ही घोषणा ऐकल्यानंतर उत्कर्षच्या डोळ्यात अश्रू तरळतात.
आतापर्यंत उत्कर्षने प्रत्येक कामात स्वत:मधील चुणूक दाखवली आहे. त्यामुळे बिग बॉसने त्याला घरातील ऑल राऊंडर खेळाडू ही नवीन ओळख दिली आहे. आतापर्यंत झालेल्या सीजनमध्ये उत्कर्ष ऑलराउंडर ठरला आहे.
दरम्यान, बिग बॉसने उत्कर्ष ऑल राऊंडर स्पर्धक असल्याचं सांगितल्यानंतर उत्कर्षच्या डोळ्यात पाणी आलं आणि तो रडू लागला. घरातील कामांपासून ते टास्क खेळण्यापर्यंत उत्कर्षने प्रत्येक गोष्टीत आपलं कौशल्य दाखवलं आहे. त्यामुळे बिग बॉसच्या नजरेत ऑल राऊंडर ठरलेल्या या खेळाडूला प्रेक्षक यंदाच्या सीजनचा विजेता करतात का हे पाहणं औत्सुक्याचं आहे.