'चला हवा येऊ द्या'मधील पोस्टमन काका बदलले; सागर कारंडेच्या जागी 'ही' व्यक्ती वाचणार पत्र?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2023 01:27 PM2023-03-01T13:27:40+5:302023-03-01T13:28:34+5:30

Chala hawa yeu dya: 'चला हवा येऊ द्या'मध्ये पत्रवाचन आणि सागर कारंडे हे जणू समीकरण झालं आहे. मात्र, झी मराठीने नुकताच एक प्रोमो शेअर केला आहे. त्यानुसार, या कार्यक्रमात सागरऐवजी एक अन्य व्यक्ती पत्रवाचन करताना दिसून येत आहे.

marathi tv show chala hawa yeu dya shreya bugde patravachaan | 'चला हवा येऊ द्या'मधील पोस्टमन काका बदलले; सागर कारंडेच्या जागी 'ही' व्यक्ती वाचणार पत्र?

'चला हवा येऊ द्या'मधील पोस्टमन काका बदलले; सागर कारंडेच्या जागी 'ही' व्यक्ती वाचणार पत्र?

googlenewsNext

'हसताय ना हसायलाच पाहिजे', असं म्हणत गेल्या कित्येक वर्षापासून डॉ. निलेश साबळे (dr. nilesh sable) 'चला हवा येऊ द्या' (chala hawa yeu dya) या रिअॅलिटीची शोच्या माध्यमातून प्रेक्षकांचं  मनोरंजन करत आहे. या कार्यक्रमातील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांच्या मनात आपलं हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. त्यातलंच एक नाव म्हणजे अभिनेता सागर कारंडे( sagar karande). आपल्या विनोदशैलीच्या जोरावर प्रेक्षकांना हसवता हसवता बऱ्याचदा तो पत्रवाचन करुन अनेकांच्या डोळ्याच्या कडा ओल्या करतो. मात्र, सध्या त्याच्या या पत्रवाचनाची जागा एका अन्य व्यक्तीने घेतल्याचं दिसून येत आहे.

'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमात सागर कारंडे कार्यक्रमात सहभागी झालेल्या पाहुण्यांना पत्रवाचन करुन दाखवतो. ही पत्रे अनेकदा भावनिक, समाजप्रबोधन करणारी वा विचार करायला लावणारी असतात. परंतु, सागर ती ज्या पद्धतीने सादर करतो ते वाखाणण्याजोगं असतं त्यामुळे 'चला हवा येऊ द्या'मध्ये पत्रवाचन आणि सागर कारंडे हे जणू समीकरण झालं आहे. मात्र, झी मराठीने नुकताच एक प्रोमो शेअर केला आहे. त्यानुसार, या कार्यक्रमात सागरऐवजी एक अन्य व्यक्ती पत्रवाचन करताना दिसून येत आहे.

सध्या सोशल मीडियावर 'चला हवा येऊ द्याचा'एक प्रोमो व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये अभिनेत्री श्रेया बुगडे (shreya bugade) पत्रवाचन करताना दिसून येत आहे. त्यामुळे आता या कार्यक्रमात सागरऐवजी श्रेयाच पत्रवाचन करणार की काय असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

दरम्यान, अलिकडेच चला हवा येऊ द्याच्या मंचावर विष्णू मनोहर, मधुरा बाचल, अर्चना आर्ते यांसारख्या सेलिब्रिटी शेफने हजेरी लावली होती. त्यामुळे या खास भागात श्रेयाने पत्रवाचन केलं. विशेष म्हणजे तिने सादर केलेल्या पत्रवाचनालादेखील नेटकऱ्यांनी सागर इतकाच उत्स्फुर्त प्रतिसाद दिला आहे.
 

Web Title: marathi tv show chala hawa yeu dya shreya bugde patravachaan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.