Video: दौलतमुळे हरपणार अभिच्या डोक्यावरचं छप्पर; इंदूचा होणार मृत्यू?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2021 19:00 IST2021-12-12T19:00:00+5:302021-12-12T19:00:00+5:30
Sundara manamadhe bharli: आता जमिनीवर कोसळलेल्या इंदूचं पुढे काय होणार? खरंच तिचा मृत्यू होणार का? की तिच्या बचावासाठी कोणी पुढे येणार?

Video: दौलतमुळे हरपणार अभिच्या डोक्यावरचं छप्पर; इंदूचा होणार मृत्यू?
सध्या छोट्या पडद्यावर अनेक मालिकांची रेलचेल असल्याचं पाहायला मिळतं. मात्र, या मालिकांच्या गर्दीत आपलं हक्काचं स्थान निर्माण करणारी मालिका म्हणजे 'सुंदरा मनामध्ये भरली' (sundara manamadhe bharli). या मालिकेतील अभिमन्यु आणि लतिका या जोडीने प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावलं आहे. त्यामुळे या मालिकेत दररोज काय घडतं हे पाहण्याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये असल्याचं पाहायला मिळतं. सध्या ही मालिका रंजक वळणावर आली असून दौलतमुळे इंदूचा मृत्यू होणार असल्याचं दिसून येत आहे.
अलिकडेच या मालिकेचा एक प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये सूडबुद्धीने पेटून उठलेला दौलत इंदूलाच जीवे मारण्याचा प्रयत्न करतांना दिसत आहे. विशेष म्हणजे या योग्यवेळी अस्थमाचा पंप न मिळाल्यामुळे इंदू जमिनीवर कोसळते. ज्यामुळे तिच्या जीवावर बेतणार आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या प्रोमोमध्ये दौलत अभिमन्युचे कपडे जाळत असतो. यावेळी इंदू त्याला जाब विचारायला येते. "माझ्या लेकाचे कपडे असे का जाळतोस", असं इंदू विचारते. त्यावर "तुझ्या लेकाचा अंत्यविधी पण याच पद्धतीने करणार असं म्हणत दौलत तिची खिल्ली उडवतो". यावर संतापलेली इंदू, दौलतच्या कानशिलात लगावते. त्यामुळे सूडबुद्धीने पेटून उठलेला दौलत तिचा चेहरा पेटत्या कपड्यांवर धरतो. ज्यामुळे धुरामुळे इंदूला श्वास घेण्यास त्रास होतो. यामध्ये इंदू घाईघाईत घरात जाऊन तिचा अस्थमाचा पंप शोधते. मात्र, तो पंप दौलतकडे असून तो पायाखाली चिरडतो. यामुळे योग्यवेळी पंप न मिळाल्यामुळे इंदू जमिनीवर कोसळते.
दरम्यान, आता जमिनीवर कोसळलेल्या इंदूचं पुढे काय होणार? खरंच तिचा मृत्यू होणार का? की तिच्या बचावासाठी कोणी पुढे येणार या सगळ्या प्रश्नांची उत्तर गुलदस्त्यात आहेत. या प्रश्नांची उत्तर प्रेक्षकांना मालिका पाहिल्यावरच उलगडतील.