मराठमोळा रितेश देशमुख येतोय 'बिग बॅास मराठी ५'मध्ये कल्ला करायला, नवीन प्रोमो आला समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2024 10:20 AM2024-06-29T10:20:28+5:302024-06-29T10:21:12+5:30

Riteish Deshmukh : रितेश देशमुखने आजवर आपल्या अभिनयाने चित्रपट रसिकांना 'वेड' लावलं आहे. पण आता टेलिव्हिजनचा पडदा व्यापून टाकायला, 'बिग बॉस’ मराठीचा हा नवा सीझन गाजवायला तो सज्ज झाला आहे.

Marathmola Riteish Deshmukh is coming to 'Bigg Boss Marathi 5', new promo is out | मराठमोळा रितेश देशमुख येतोय 'बिग बॅास मराठी ५'मध्ये कल्ला करायला, नवीन प्रोमो आला समोर

मराठमोळा रितेश देशमुख येतोय 'बिग बॅास मराठी ५'मध्ये कल्ला करायला, नवीन प्रोमो आला समोर

नुकतीच बिग बॉस ओटीटी(Bigg Boss OTT 3)च्या तिसऱ्या सीझनला सुरूवात झाली. या सीझनचे सूत्रसंचालन अनिल कपूर(Anil Kapoor) करत आहेत. हा शो पाहून महाराष्ट्रातील प्रेक्षकांना मराठी बिग बॉसची ओढ लागली आहे. त्यात बिग बॉस मराठी ५ (Bigg Boss Marathi 5)चे सूत्रसंचालन महेश मांजरेकर (Mahesh Manjarekar) नाही तर रितेश देशमुख (Riteish Deshmukh) करणार असल्याचे समजल्यावर रसिकांची उत्सुकता आणखी वाढली आहे. दरम्यान आता बिग बॉस मराठीच्या नव्या सीझनचा नवीन प्रोमो रिलीज करण्यात आला आहे. या प्रोमोला नेटकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. 

रितेश देशमुखने आजवर आपल्या अभिनयाने चित्रपट रसिकांना 'वेड' लावलं आहे. पण आता  टेलिव्हिजनचा पडदा व्यापून टाकायला, 'बिग बॉस’ मराठीचा हा नवा सीझन गाजवायला तो सज्ज झाला आहे. रितेशच्या येण्याने 'बिग बॉस'च्या घरात जबरदस्त कल्ला होणार आहे. एकंदरीतच आपल्या मराठमोळ्या रितेश भाऊमुळे 'बिग बॉस' आणखी ग्रँड होणार आहे.

रितेश भाऊची 'लयभारी' स्टाईल!
'बिग बॉस मराठी'च्या नव्या सीझनमध्ये रितेश देशमुख होस्ट असल्याने यावेळी खूप धमाल पहायला मिळणार आहे. 'बिग बॉस मराठी'चा नवा प्रोमो नुकताच रिलीज झाला आहे. या प्रोमोमध्ये रितेशचा रूबाब अन् त्याची 'लय भारी' स्टाईल पाहायला मिळत आहे. तसेच त्याचा कमाल स्वॅगही अनुभवायला मिळत आहे. रितेशची 'बॉस'गिरी पाहण्याची चाहत्यांमध्ये चांगलीच उत्सुकता आहे. 'बिग बॉस'मध्ये आतापर्यंत एका वेगळ्या पद्धतीचे खेळ, नियम आणि टास्क होते. पण आता रितेशच्या येण्याने नावीन्य असल्याचे प्रोमोवरुन स्पष्ट दिसत आहे. त्यामुळेच तर रितेश भाऊ म्हणतोय,"आता मी आलोय... कल्ला तर होणारच...!!”
 

Web Title: Marathmola Riteish Deshmukh is coming to 'Bigg Boss Marathi 5', new promo is out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.