'मेरी कॉम'चे राजकारणावर मतप्रदर्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2018 09:47 AM2018-03-05T09:47:01+5:302018-03-05T15:17:01+5:30

देशातील विद्यमान राजकीय परिस्थितीमुळे अनेकजण त्यावर आपले मत व्यक्त करीत असून त्यात खेळाडू आणि सेलिब्रिटींचाही मोठा सहभाग दिसून येत ...

'Marie Com's Politics' | 'मेरी कॉम'चे राजकारणावर मतप्रदर्शन

'मेरी कॉम'चे राजकारणावर मतप्रदर्शन

googlenewsNext
शातील विद्यमान राजकीय परिस्थितीमुळे अनेकजण त्यावर आपले मत व्यक्त करीत असून त्यात खेळाडू आणि सेलिब्रिटींचाही मोठा सहभाग दिसून येत आहे.ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये बॉक्सिंगच्या खेळात भारताचे प्रतिनिधित्त्व केलेल्या मेरी कोमने एक राजकीय नेता या नात्याने अलीकडेच देशातील परिस्थितीवर आपले मतप्रदर्शन केले.राज्यसभेवर नियुक्त करण्यात आलेल्या या नामवंत बॉक्सरला संसद सदस्य, आपल्या स्पर्धा आणि बॉक्सिंगची प्रशिक्षक अशा जबाबदा-या एकदमच पार पाडाव्या लागत आहेत. अलीकडेच तिने एका मुलाखतीत सांगितले, “या सर्व जबाबदा-या एकदम पार पाडणं ही सोपी गोष्ट नसून त्याचा माझ्यावर बराच ताण पडतो आहे. संसदेत मला 100 टक्के उपस्थित राहता येत नसले,तरी मी निदान 70 टक्के तरी संसदेत उपस्थित राहीन, याची काळजी घेते. मला ही संधी मिळाल्याचा मला आनंद वाटतो आणि आता खेळाशी संबंधित अनेक प्रश्न मी संसदेत उपस्थित करू शकते. पण मी राजकारणात राहू शकत नाही,असं मला दिसून आलं आहे. मी तशी सरळसाधी स्त्री असून मला खोटं बोलता येत नाही. परंतु राजकारणात तुम्हाला कधीतरी का होईना, खोटं बोलावं लागतं.”'मेरी कॉम'ने व्यक्त केलेल्या या मताशी सामान्य माणूस निश्चितच सहमत होईल कारण बरेच भ्रष्ट राजकीय नेते सामान्य माणसाला बरीच आश्वासने देत असतात पण ती ते कधीच पूर्ण करीत नाहीत.‘स्टार प्लस’वरील ‘हर शाख पे उल्लू बैठा है’ या आगामी मालिकेत नेमक्या याच मुद्द्याला हात घालण्यात आला आहे.मालिकेत चैतूलाल या एका भ्रष्ट नेत्याच्या चित्रणाद्वारे देशातील राजकीय परिस्थितीवर भाष्य करण्यात आले आहे.चैतूलाल हा मुख्यमंत्रीपदासाठी आसुसलेला असून या सत्तालालसेबद्दल त्याला अजिबात अपराधी वाटत नाही.


‘हर शाख पे ऊल्लू बैठा है’ सह. हा मुख्यमंत्री निरागस जनतेला खोटी आश्वासने देऊन भूलवण्यासाठी मानला जातो.अन्य कुठल्याही नेत्याप्रमाणे चैतू हा कटकारस्थानी आहे,शब्दांचा खेळ करणारा आणि संधीसाधू आहे.त्याच्या ठेंगा पार्टीला केवळ काळ्‌या पैशाची हाव आहे आणि त्यासाठी सिस्टममध्ये काहीही कारस्थाने ते करू शकतात.सामान्य लोकांना ज्या गोष्टीचा फायदा होईल त्याची वचने तो देतो पण त्याला ज्याचा फायदा होईल ते तो करतो. ह्या कॉमेडी शोमध्ये त्याला समर्थन देईल त्याची पत्नी इमली देवी (समता सागर).आयुष्यातील प्रत्येक चांगल्याकठीण परिस्थितीमध्ये ती आपल्या पतीच्या पाठीशी उभी राहते. जरी चैतू सत्ताधारी पक्षाचा नेता असला तरी घरी मात्र त्याची पत्नीच त्याच्यासाठी आधारस्तंभ आहे. इमलीला आपला भाऊ आणि सीएमचा उत्साही साला पुतन (इश्तियाक खान) ला देशाचा पंतप्रधान बनलेले पाहायचे आहे. आपल्या राज्यातील युवानेता पुतन आपल्या जिजाजीसारखाच धोरणी आहे. त्याच्या विरोधात पोलिसात १३ गुन्हे दाखल असून त्याने राज्यातील सर्व उत्तम महाविद्यालयांमधून पदव्या विकत घेतल्या आहेत.राजकारण आणि भ्रष्टाचारामध्ये पुतन चैतूपेक्षा अजिबात कमी नाहीये.हा शो सामान्य माणसाच्या समस्यांकडे विडंबनात्मक पद्धतीने पाहतो. यात चैतू लाल सामान्य माणसांच्या समस्या जसे शिक्षण, पायाभूत सुविधा,भ्रष्टाचार इत्यादींसोबत लढताना आणि निवडणूकांमधील धांदली,एमएलएची खरेदी विक्री आणि जनतेच्या पैशाचा गैरवापर करणाऱ्या काहीही कमिट्‌या निर्माण करतानाही पाहायला मिळेल.ह्या घडामोडींबद्दल विनोदी परिस्थितीमध्ये राजकारणाची कुरूप बाजू पाहायला मिळणार आहे.

Web Title: 'Marie Com's Politics'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.