रिया शर्माने सांगितले लग्नाबाबतचे मत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2019 07:15 AM2019-05-01T07:15:00+5:302019-05-01T07:15:00+5:30

स्टार प्लसवरील ‘ये रिश्ते है प्यार के’ ही मालिका नातेसंबंध, विवाह आणि कौटुंबिक संबंध यावर भाष्य करते.

Marital courtship is not a one-way street and either person has the freedom to say no at any point: Rhea Sharma | रिया शर्माने सांगितले लग्नाबाबतचे मत

रिया शर्माने सांगितले लग्नाबाबतचे मत

googlenewsNext

स्टार प्लसवरील ‘ये रिश्ते है प्यार के’ ही मालिका नातेसंबंध, विवाह आणि कौटुंबिक संबंध यावर भाष्य करते. या मालिकेतून पुरोगामी विचार मांडण्यात आले आहेत. या मालिकेची कथा आपल्या जीवनसाथीची निवड विचारपूर्वक घेण्यावर आधारीत आहे. आता ही संकल्पना आणखी एक पाऊल पुढे नेताना मालिकेच्या निर्मात्यांनी विवाहपूर्व मैत्रीच्या संबंधांच्या विषयाला स्पर्श केला आहे. या मालिकेत मिष्टी या नायिकेची मध्यवर्ती भूमिका रंगविणारी अभिनेत्री
रिया शर्मा हिचे विचारही त्यातील मूळ संकल्पनेशी जुळणारे आहेत.

रिया शर्मा म्हणाली, ये रिश्ते है प्यार केसारख्या मालिकेत मला प्रमुख भूमिका साकारण्यास मिळत असल्याचा मला आनंद वाटतो आणि या मालिकेतील माझ्या मिष्टी या भूमिकेद्वारे विवाहपूर्व मैत्रीच्या संबंधांच्या विषयाला हात घातला आहे.

विवाहपूर्व मैत्री हा काळ असा असतो की दोन व्यक्ती एकमेकांशी विवाहबद्ध होण्यापूर्वी परस्परांचे विचार आणि व्यक्तिमत्त्व जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. पण हे काही एकतर्फी नाते नव्हे आणि समोरच्या व्यक्तीचे विचार पटले नाहीत, तर कोणालाही कोणत्याही टप्प्यावर विवाहास नकार देण्याचा अधिकार असतो. 


कुणालबरोबर (ऋत्विक अरोरा) लग्न करण्यापूर्वी मिष्टी त्याचे विचार जाणून घेण्याची मागणी करते; पण दोघांच्याही कुटुंबियांना हा नेमका काय प्रकार आहे, ते समजत नसल्याने काहीसे गोंधळाचे आणि विरोधाचे वातावरण निर्माण होते. मिष्टीच्या व्यक्तिरेखेद्वारे मला या जुनाट मानसिकतेच्या विरोधात आपले विचार मांडण्याची संधी मिळत आहे आणि ही एका कणखर आणि शक्तिशाली मुलीची भूमिका आहे. ती आपली मते ठामपणे व्यक्त करीत असते. प्रेक्षकांना मिष्टी ही आपल्या हक्कांबद्दल जागरूक आणि आग्रही असलेली मुलगी आहे, असे आगामी भागात पहायला मिळणार आहे.


समाजाच्या मानसिकतेत बदल घडवून आणण्याच्या दृष्टीने यात पुरोगामी विचार मांडण्यात आले असून त्यातील रियाची व्यक्तिरेखा ही एका सक्षम आणि कणखर मुलीची असल्याने प्रेक्षकांना काही धाडसी प्रसंग पाहायला मिळतील.

Web Title: Marital courtship is not a one-way street and either person has the freedom to say no at any point: Rhea Sharma

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.