Bigg Boss Marathi 5 : लग्न ठरलं अन् बिग बॉसची ऑफर आली, कोकण हार्टेड गर्लचा खुलासा, म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2024 11:37 AM2024-07-29T11:37:58+5:302024-07-29T11:39:07+5:30
Bigg Boss Marathi 5 : सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर कोकण हार्टेड गर्ल अंकिता प्रभू-वालावलकर (Ankita Prabhu-Walawalkar) 'बिग बॉस मराठी'च्या घरात येणार याबाबत सुरुवातीपासून चर्चा रंगली होती आणि यंदाच्या पर्वात ती सहभागी झाली आहे.
टेलिव्हिजनवरील लोकप्रिय आणि वादग्रस्त शो बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन (Bigg Boss Marathi 5) नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर कोकण हार्टेड गर्ल अंकिता प्रभू-वालावलकर (Ankita Prabhu Walawalkar) 'बिग बॉस मराठी'च्या घरात येणार याबाबत सुरुवातीपासून चर्चा रंगली होती आणि यंदाच्या पर्वात ती सहभागी झाली आहे. दरम्यान आता अंकिताने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यात तिने तिच्या प्रियकराबद्दल सांगितले आहे. इतकेच नाही तर तिचे लग्न ठरलं होतं आणि तिला बिग बॉस शोची ऑफर आली, याबद्दलचा खुलासा तिने या पोस्टमध्ये केलाय.
अंकिता प्रभू-वालावलकर हिने इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत लिहिले की, प्रिय कोकण हार्टेड बॉय, रात्री २ वाजता यशस्वी भव: हे गिफ्ट घेऊन येणं रोमँटिक समजू की काळजी? कारण बिग बॉसमध्ये जाण्यासाठी २ दिवस बाकी उरलेत फक्त..खरंतर आयुष्यात कुणी यावं हे तुमच्या कपाळावरची नशीबाची रेषा सांगते, पण तुमच्या आयुष्यात कुणी थांबायचं हे तुमचे ह्रदय ठरवते. तू माझ्या आयुष्यात आलास आणि मला आयुष्याकडे कसं बघायचं हे शिकवलंस. तुझे शब्द माझी ताकद आहेत. तू हिमतीने माझ्यासोबत उभा आहेस हे बघुन आई पण निश्चिंत आहे. तुझी सगळी वाक्य लक्षात ठेऊन ह्या नवीन प्रवासाला सुरुवात करतेय.
तिने या पोस्टमध्ये पुढे म्हटले की, जेव्हा लग्न करु अस आपण ठरवलं आणि बिग बॉसची ऑफर आली, माझ्यासाठी इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती होती त्यात मी ठरवलं की तुला जे योग्य वाटेल ते करेन पण तू म्हणालास “माझा विचार नको करूस ,मी आजही आहे ,उद्याही असेन पण तू मेंटली नीट राहणार असशील तर जा” ”लवकर ये पण जिंकुन ये,आलीस की लग्न करु फक्त जशी आहेस तशीच वाग,जिंकण्यासाठी फेक वागू नकोस,हरलीस तरी चालेल“ हे सगळं लक्षात ठेऊन जातेय,लवकरच येईन पण छान राहुन येईन,तू तयारीला लाग. तुझ्यासोबत १९५ देश फिरायचे आहेत. फुलांची खूप आठवण येईल. येते. ता.क.- dyson चा बॉक्स फाडून यशस्वी भव: लिहिण्याची शिक्षा आल्यावर दिली जाईल. तुझीच, गुणी पोरगी.