मराठी सिनेइंडस्ट्रीत लग्नाचे वारे, आता आणखी एक प्रसिद्ध अभिनेत्री अडकली लग्नबेडीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2023 14:52 IST2023-05-22T14:52:03+5:302023-05-22T14:52:26+5:30
गेल्या काही दिवसांपासून टीव्ही मालिका क्षेत्रातील कलाकारांची लगीनघाई सुरू झालेली पाहायला मिळाली.

मराठी सिनेइंडस्ट्रीत लग्नाचे वारे, आता आणखी एक प्रसिद्ध अभिनेत्री अडकली लग्नबेडीत
मराठी सिनेइंडस्ट्रीत लग्नाचे वारे वाहू लागले आहेत. गेल्या काही दिवसांपासून टीव्ही मालिका क्षेत्रातील कलाकारांची लगीनघाई सुरू झालेली पाहायला मिळाली. काही दिवसांपूर्वी अभिनेता संकेत पाठक आणि अभिनेत्री सुपर्णा श्यामने लग्नगाठ बांधली. फुलाला सुगंध मातीचा फेम अभिनेता आकाश पाटीलचेही नुकतेच लग्न पार पडले. शाल्व किंजवडेकरने साखरपुडा करून अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.अशातच आता प्रसिद्ध अभिनेत्री रश्मी पाटील(Rashmi Patil)चा काल म्हणजेच २१ मे रोजी लग्न पार पडले.
रश्मी पाटील ही मराठी मालिका अभिनेत्री तसेच मॉडेल आहे. झी मराठीवरील कारभारी लयभरी या मालिकेत तिने शोना मॅडमची भूमिका साकारली होती. २१ एप्रिल २०२३ रोजी पुण्यातील महाराजा रेस्टोरंटमध्ये रश्मी पाटीलने अक्षय सोबत मोठ्या थाटात साखरपुडा केला होता. त्यानंतर आता आज २१ मे रोजी हे दोघेही विवाहबद्ध झाले आहेत. दोन दिवसांपूर्वी रश्मीने मेहेंदी सोहळा पार पडला होता. त्यानंतर हळदीचा सोहळा पार पडला. रश्मी पाटीलच्या लग्नाचे फोटो अद्याप समोर आलेले नाहीत. मात्र मेहंदीमध्ये तिने तिच्या लग्नाची तारीख शेअर केली आहे.
रश्मीबद्दल सांगायचं झालं तर ती मूळची सांगलीची असून वाडिया कॉलेजमधून तिने आर्ट्समधून पदवीचे शिक्षण घेतले आहे. यासोबतच ती एक इंटेरिअर डिझायनर देखील आहे. रश्मीला लहानपणापासूनच नृत्याची विशेष आवड होती. कथ्थक, साल्सा, बेलीडान्स, भरतनाट्यम, लॅटिन अशा विविध फॉर्म मधून नृत्याचे धडे गिरवले आहेत.
नृत्यात निपुण असलेल्या रश्मीने सुरुवातीला मॉडेलिंग क्षेत्रातही आपला जम बसवला होता. प्राजक्ता, वचन दिले तू मला यांसारख्या मालिकेतून तिने अभिनय क्षेत्रात पाऊल टाकले. एक गाव बारा भानगडी या वेबसीरीजमध्येही ती झळकली. कारभारी लयभारी मालिकेत तिने साकारलेली शोना मॅडमची विरोधी भूमिका प्रेक्षकांच्या विशेष स्मरणात राहिली होती.