दमनप्रीतसिंग घेतोय मार्शल आर्टचे प्रशिक्षण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2017 09:33 AM2017-05-04T09:33:42+5:302017-05-04T15:03:42+5:30

शिकणे कधी संपत नसते, असे म्हणतात ते खरेच आहे,‘शेर-ए- पंजाब : महाराजा रणजितसिंग’ या भव्य ऐतिहासिक मालिकेमध्ये लहानपणीच्या रणजितसिंगची ...

Martial arts training at Damanpreet Singh | दमनप्रीतसिंग घेतोय मार्शल आर्टचे प्रशिक्षण

दमनप्रीतसिंग घेतोय मार्शल आर्टचे प्रशिक्षण

googlenewsNext
कणे कधी संपत नसते, असे म्हणतात ते खरेच आहे,‘शेर-ए- पंजाब : महाराजा रणजितसिंग’ या भव्य ऐतिहासिक मालिकेमध्ये लहानपणीच्या रणजितसिंगची भूमिका साकारणा-या दमनप्रीतसिंगला सध्या अनेक गोष्टींचे प्रशिक्षण घ्यावे लागत आहे. आतापर्यंत त्याने या भूमिकेसाठी घोडेस्वारी आणि तलवारबाजीचे प्रशिक्षण घेतले असून आता तो मार्शल आर्टसचे प्रशिक्षण घेत आहे. या मालिकेत वीरसिंगची भूमिका साकारणा-या माखनसिंग यांच्याकडूनच दमन हे प्रशिक्षण घेत आहे. माखनसिंग हे मार्शल आर्टसचे व्यावसायिक प्रशिक्षक आहेत. मालिकेत ते रणजितसिंगचे शिक्षक ‘योध्दाजी’ची भूमिका साकारत असून ते त्याला  लष्करी कलांचे प्रशिक्षण देत असतात. त्यामुळे दमनप्रीतसिंग केवळ पडद्यावरच नव्हे, तर पडद्यामागेही त्यांच्याकडून युध्दकलेचे प्रशिक्षण घेताना दिसत आहे.यासंदर्भात दमनप्रीतसिंगला विचारले असता त्याने सांगितले, “मला जेव्हा माखनसिंग यांच्याकडून मार्शल आर्टचे प्रशिक्षण घेण्याची सूचना करण्यात आली, तेव्हा मला सर्वप्रथम आठवण झाली टायगर श्रॉफच्या ‘बागी’ चित्रपटाची. त्यात टायगर श्रॉफ त्याच्या गुरूकडून असंच प्रशिक्षण घेत असताना दाखवलं आहे. केवळ मालिकेतच नव्हे, तर वास्तव जीवनातही माखनसिंग यांच्यासारख्या तज्ज्ञाकडून या कलेचं प्रशिक्षण मिळत असल्याबद्दल मी स्वत:ला सुदैवी समजतो. या काळात शरीर ताणण्याचं महत्त्व आणि ठाम निर्धार याचं महत्त्व मला पटलं आहे. मला अजून बरंच काही शिकायचं असल्याचे दमनप्रीत सांगतो.तसचे सध्या मालिकेच्या शूटिंगमध्ये बिझी असल्यामुळे दमनप्रीतला शाळेत जाणे शक्य नसले तरीही त्याला अभ्यासाला सोडचिठ्ठी द्यावी लागली नाही.त्याला चक्क सेटवर शिक्षक शिकवणीसाठी येतात त्यामुळे शूटिंगमध्ये बिझी असतानाही त्याचे शिक्षणही रितसर सुरू आहे.

Web Title: Martial arts training at Damanpreet Singh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.