​छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार मस्तीचा रिमेक

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2017 11:57 AM2017-02-17T11:57:01+5:302017-02-17T17:27:01+5:30

विवेक ऑबेरॉय, आफताब शिवदासानी आणि रितेश देशमुख यांची प्रमुख भूमिका असलेला मस्ती हा चित्रपट प्रचंड गाजला होता. या चित्रपटाच्या ...

Masti Remake will be seen on the small screen | ​छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार मस्तीचा रिमेक

​छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार मस्तीचा रिमेक

googlenewsNext
वेक ऑबेरॉय, आफताब शिवदासानी आणि रितेश देशमुख यांची प्रमुख भूमिका असलेला मस्ती हा चित्रपट प्रचंड गाजला होता. या चित्रपटाच्या यशानंतर या चित्रपटाचे ग्रँड मस्ती आणि ग्रेट ग्रँड मस्ती हे सिक्वेलदेखील बनवले गेले होते. या चित्रपटांनादेखील प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. आता मस्ती हा चित्रपट मालिकेच्या स्वरूपात प्रेक्षकांना पाहायला मिळणार असल्याची चर्चा आहे. या चित्रपटाचा रिमेक आता छोट्या पडद्यावर होणार आहे.
श्री अधिकारी ब्रदर्सने मस्ती या चित्रपटाची निर्मिती केली होती. या प्रोडक्शन हाऊसने छोट्या पडद्यावर अनेक चांगल्या मालिका तर मोठ्या पडद्यावर अनेक चांगल्या चित्रपटांची निर्मिती केली आहे. आता ते एक नवी वाहिनी लाँच करणार असल्याची चर्चा आहे आणि त्याचसोबत मस्ती या त्यांच्या अतिशय गाजलेल्या चित्रपटावर ते मालिका बनवणार असल्याचे कळतेय. मस्ती या चित्रपटावर बनवली जाणार असलेली मालिका ही काहीच भागांची असून या मालिकेवर सध्या काम सुरू आहे.
या मालिकेत कोण काम करणार याचा विचार मालिकेची टीम सध्या करत आहे. कारण मस्ती या चित्रपटात विवेक, आफताब आणि रितेश यांनी साकरलेली भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली होती. त्यामुळे त्यांच्या ताकदीचे कलाकार शोधण्याचे सध्या काम प्रोडक्शन हाऊस करत आहे. या मालिकेची घोषणा झाल्यापासून आता या मालिकेत कोण भूमिका साकारणार याची उत्सुकता सगळ्यांना लागलेली आहे. 
मस्ती हा एक अॅडल्ट कॉमेडी चित्रपट असल्याने मस्ती या चित्रपटावर आधारित मालिका देखील अॅडल्ट कॉमेडी मालिका असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे प्रेक्षकांना आता पहिल्यांदाच छोट्या पडद्यावर एक अॅडल्ट कॉमेडी मालिका पाहायला मिळणार आहे असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही 

Web Title: Masti Remake will be seen on the small screen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.