Mazhi Tuzhi Reshimgaath : ‘माझी तुझी रेशीमगाठ’मधून ‘हा’ अभिनेता घेणार तब्बल 21 दिवसांचा ब्रेक, जाणून घ्या कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2022 02:24 PM2022-07-03T14:24:45+5:302022-07-03T14:29:47+5:30
Mazhi Tuzhi Reshimgaath : होय, प्रेक्षकांच्या या लाडक्या मालिकेतील एक लाडका कलाकार ब्रेक घेणार आहे. ते सुद्धा एक-दोन दिवस नव्हे तर तब्बल 21 दिवस. ते सुद्धा एक-दोन दिवस नव्हे तर तब्बल 21 दिवस.
झी मराठी वाहिनीवर (Zee Marathi) ‘माझी तुझी रेशीमगाठ’ (Mazhi Tuzhi Reshimgaath ) ही प्रेक्षकांची आवडती मालिका. टीआरपी चार्टमध्ये टॉप 5 मध्ये असलेल्या या मालिकेतील सगळेच कलाकार प्रेक्षकांचे आवडते आहेत. श्रेयस तळपदे, प्रार्थना बेहरे, संकर्षण कऱ्हाडे, प्रदीप वेलणकर यांच्या अभिनयाने सजलेल्या याच मालिकेबद्दल सध्या एक मोठी अपडेट आहे. होय, प्रेक्षकांच्या या लाडक्या मालिकेतील एक लाडका कलाकार ब्रेक घेणार आहे. ते सुद्धा एक-दोन दिवस नव्हे तर तब्बल 21 दिवस.
मालिकेत नेहा व यशचं नुकतंच लग्न झालं. दोघांचा संसार आनंदाने न्हाऊन निघाला असताना सिम्मी काकूंसोबत नेहाची वहिनी आणि तिचा पहिला पती कटकारस्थान करताना दिसून येत आहेत. या सर्व संकटातून वाट काढत यश व नेहा पुढे जात आहेत आणि त्यांना मिथिला आणि विश्वजीत काका-काकूंची मदत मिळत आहेत. पण आता येणारे काही दिवस विश्वजीत काका या मालिकेतून गायब राहणार आहेत.
होय, ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेतील विश्वजित काका 21 दिवसांच्या ब्रेकवर जात आहेत. विश्वजीत काकांची भूमिका अभिनेते आनंद काळे (Anand Kale ) यांनी साकारली आहे. या पात्रामुळे घराघरात त्यांना ओळख मिळाली आहे. मात्र आता आनंद काळे मालिकेतून 21 दिवसांचा ब्रेक घेणार आहेत. याचं कारणही समोर आलं आहे.
तर याचं कारण आहे बाईक टूर. होय, आनंद काळे हे बाईकवरुन कोल्हापूर ते कश्मीर लेह लडाख अशी सफर करणार आहेत. त्यामुळेच त्यांनी या मालिकेतून ब्रेक घेतला आहे. पुढील 21 दिवस 7000 किलोमीटरचा प्रवास करुन ते आपलं स्वप्न पूर्ण करणार आहेत. यामुळे त्यांनी ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेतून ब्रेक घेतला आहे. त्यांनी स्वत: एक पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे.
आनंद काळे यांना स्पोर्ट बाईक्सची अतिशय आवड आहे. बायकिंग आणि रेसिंगचीही त्यांना आवड आहे. काही दिवसांपूर्वीच संगीतकार अजय अतुल फेम अतुल गोगावले यांनी BMW R1250 GS ही स्पोर्ट्स बाईक खरेदी केली होती. त्यावेळी आनंद काळे यांनी अतुल गोगावले यांचं अभिनंदन करत ‘चला आता राईडला लेह लडाख इन जुलै’ असं म्हटलं होतं.
आनंद काळे खऱ्या आयुष्यात एक यशस्वी व्यावसायिक असून त्यांचे काही हॉटेल्स आहेत. दिग्दर्शक यशवंत भालकर यांच्या ‘घे भरारी’ या चित्रपटातून त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली. त्यानंतर अनेक गाजलेले चित्रपट, मालिकांमध्ये ते दिसले. कोल्हापूरात त्यांनी ‘हॉटेल राजपुरुष’ या नावाने हॉटेल सुरू केलं. 2016 मध्ये त्याने ‘हॉटेल कार्निव्हल’ हे दुसरं नवीन हॉटेल सुरु केलं. त्याचं एक प्रोडक्शन हाऊसदेखील आहे.