श्रेयस तळपदेसोबत 'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेच्या सेटवर घडलेली ही घटना अभिनय नसून रिअल होती ? व्हिडीओ Viral
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2021 13:23 IST2021-12-13T13:21:05+5:302021-12-13T13:23:22+5:30
अभिनेता श्रेयस तळपदेने(Shreyas Talpade) आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकली आहेत. मराठीच नाही तर हिंदी सिनेप्रेमींची मनंही त्याने आपल्या अभिनयाने जिंकली आहेत.

श्रेयस तळपदेसोबत 'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेच्या सेटवर घडलेली ही घटना अभिनय नसून रिअल होती ? व्हिडीओ Viral
'माझी तुझी रेशीमगाठ' ( Mazhi Tuzhi Reshimgaath) ही मालिका छोट्या पडद्यावर गाजतेय. त्यामधील श्रेयस-प्रार्थनाची जोडी आणि छोटी परी यांची घराघरांत चर्चा होतेय. मालिकेची कथा आणि कलाकारांचा दर्जेदार अभिनय यामुळे मालिका सुरु झाली तेव्हा पासून रसिकांच्या पसंतीस पात्र ठरली होती. दिवसेंदिवस मालिकेत येणारे ट्विस्टमुळे मालिकेला रसिक खिळून असतात.
अभिनेता श्रेयस तळपदेने(Shreyas Talpade) आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकली आहेत. मराठीच नाही तर हिंदी सिनेप्रेमींची मनंही त्याने आपल्या अभिनयाने जिंकली आहेत. सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे. त्यामुळे सेलिब्रेटी शूूटिंगमधून वेळ मिळताच काय काय करतात हे जाणून घेण्यातही चाहत्यांना तितकाच रस असतो. सेटवरचे किस्से आणि धम्माल गंमतीजंमती रसिकांनाही तितक्याच ऐकायला आवडतात. अनेकदा कलाकारांचे शूटिंगदरम्यानचे व्हिडीओ चर्चेचा विषय ठरतात.असाच एका खास व्हिडीओने सध्या सोशल मीडियावर चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. या व्हिडीओला त्याने खास कॅप्शनही दिले आहे. ''इन्तहा हो गई, इंतज़ार की आयी ना कुछ ख़बर, मेरे कॉल टाइम की।''
श्रेयस कायमच सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतो. मालिकेच्या सेटवरचे मजेशीर किस्सेही तो शेअर करताना दिसतो. नुकतंच त्याने सोशल मीडियावर त्याचा एक व्हिडीओ चाहत्यांसह शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहून चाहतेसुद्धा हसून हसून लोटपोट होत आहेत. चाहतेच नाहीतर सेलिब्रेटीदेखील त्याच्या या व्हिडीओवर कमेंट्स करताना दिसत आहे. श्रेयसचा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये श्रेयस शूटिंग सेटवर त्याच्या सीनची वाट पाहात आहे. तो पूर्ण तयारीत बसला आहे.
कधी त्याला सीन शूटसाठी बोलावतात याचीच तो वाट पाहात आहे. बुलाया क्या ? आऊ क्या ? प्रश्न विचारताना दिसतोय. मात्र काहीही केल्या त्याचा सीनला सुरुवात होत नाही. अखेर वैतागून तो म्हणतो जाऊ क्या ? त्याच्या रुममध्ये तो कधी झोपतोय तर कधी टाईम पास करताना दिसतोय. वेळ जात नसल्याने तो चांगलाच वैतागल्याचेही दिसतोय. सध्या त्याचा हा मेजशीर अंदाज चाहत्यांच्याही पसंतीस पात्र ठरत आहे. ऑनस्क्रीनच नाही तर ऑफस्कीनही तो चाहत्यांचे मजेशीर व्हिडीओतून मनोरंजन करताना दिसतो.