'माझी तुझी रेशीमगाठ'मधील परी झळकली शॉर्टफिल्ममध्ये, मायराने साकारलेल्या अनूच्या भूमिकेचं होतंय कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2022 06:35 PM2022-10-10T18:35:24+5:302022-10-11T21:26:16+5:30

माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत परी ही भूमिका साकारणारी मायरा सध्या लोकप्रिय बालकलाकार म्हणून ओळखली जाते

Mazhi Tuzhi Reshimgath fame Myra's new short film Viral | 'माझी तुझी रेशीमगाठ'मधील परी झळकली शॉर्टफिल्ममध्ये, मायराने साकारलेल्या अनूच्या भूमिकेचं होतंय कौतुक

'माझी तुझी रेशीमगाठ'मधील परी झळकली शॉर्टफिल्ममध्ये, मायराने साकारलेल्या अनूच्या भूमिकेचं होतंय कौतुक

googlenewsNext

सध्याच्या काळात अनेक चित्रपट, मालिकांमध्ये कलाकारांसोबतच काही बालकलाकारही पाहायला मिळतात. यात काही बालकलाकार असे असतात जे त्यांच्या निरागसपणामुळे प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतात आणि कायमस्वरुपी त्यांच्या स्मरणात राहतात. त्यातलीच एक बालकलाकार म्हणजे मायरा वायकुळ. माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत परी ही भूमिका साकारणारी मायरा सध्या लोकप्रिय बालकलाकार म्हणून ओळखली जाते. सध्या मायरा एका खास कारणामुळे चर्चेत येत आहे.

मोबाईल पोल्युशनवर मेसेज देणारी मायराची शॉर्टफिल्म गेल्या काही दिवसांपासून व्हायरल होत आहे. ही शाॅर्टफिल्म मराठी, हिंदी आणि कन्नड अशा तीन भाषांमध्ये बनवली आहे. मोबाईलमुळे जग जवळ आलं असलं तरी नात्यांमधला जिव्हाळा कुठेतरी हरवत चालला आहे. त्यामुळे 'सतर्क व्हा' असा इशारा करणारी ही फिल्म अगदी रोजच्या आयुष्यात  घडणारा एक प्रसंग घेऊन आली आहे. छोट्या अनूच्या (मायरा वायकुळ) पाचव्या वाढदिवसाचं जंगी आयोजन केलं जातं.  पण वाढदिवसाच्या दिवशी हजर असलेले नातेवाईक मोबाईलमध्ये व्यस्त असतात. एकमेकांच्या समोर असून सुद्धा मोबाइलच्या माध्यमातून कनेक्ट होतात. जेव्हा केक कापण्याची वेळ येते, तेव्हा तर सगळे मोबाईलला समोर धरून तो इव्हेंट शूट  करतात.  मात्र अनूला हे काही नकोय.. तिला मोबाईलच्या माध्यमातून नात्यांशी  जोडायचं नाहीय; तर माणसांच्या सहवासातून नात्यांच्या घट्ट बंधनात गुंफलं जायचंय. तिला मोठ्ठा केक नकोय, मोठाले गिफ्ट नकोयत, तर तिला हवाय  'वेळ'.  या वेळेतूनच तिला हरवत चाललेली नाती जोडायची आहेत.  त्या नात्यांमधला जीवंतपणा निर्माण करायचा आहे.  तसं ती आग्रहाने सांगत Disconnect to Reconnect...हा महत्त्वाचा मेसेज  देते.

 
या शॉर्टफिल्मचे दिग्दर्शन वैभव पंडित यांनी केलं आहे. शॉर्टफिल्मविषयी वैभव सांगतात, " तंत्रज्ञानामुळे जग जवळ आलंय.  वेळ वाचत आहे. हे खरंय, पण अशा काही चांगल्या परिणामांचे दुष्परिणामही आहेत. सगळ्यात महत्त्वाचा दुष्परिणाम म्हणजे नात्यांमध्ये कृत्रीमता वाढू लागली आहे. माणसं एकमेकांना वेळ देण्यापेक्षा तंत्रज्ञानाला सर्वात जास्त वेळ देत आहेत. तंत्रज्ञानाचे फायदे मानवी नात्यांवर कसा परिणाम करतात हेच तर आम्ही शॉर्टफिल्ममधून मांडण्याचा प्रयत्न  केला आहे.  त्यासाठी  आम्ही मोबाईलचं उदाहरण शॉर्टफिल्ममध्ये दिलं आहे. 

Web Title: Mazhi Tuzhi Reshimgath fame Myra's new short film Viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.