माझी तुझी रेशीमगाठ: परीविरोधात रचलेला डाव सिम्मीवरच उलटणार; आजोबांसमोर येणार सत्य?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2022 05:51 PM2022-05-11T17:51:06+5:302022-05-11T17:51:30+5:30

mazi tuzi reshimgath: चौधरी कुटुंबातील प्रत्येक जण परीची काळजी घेत आहेत. परंतु, सिम्मी एकमेव अशी व्यक्ती आहे जी परीला त्रास देण्याचा प्रयत्न करते.

mazi tuzi reshimgath pari and simmi special episode | माझी तुझी रेशीमगाठ: परीविरोधात रचलेला डाव सिम्मीवरच उलटणार; आजोबांसमोर येणार सत्य?

माझी तुझी रेशीमगाठ: परीविरोधात रचलेला डाव सिम्मीवरच उलटणार; आजोबांसमोर येणार सत्य?

googlenewsNext

'माझी तुझी रेशीमगाठ' (mazi tuzi reshimgath) या मालिकेला प्रेक्षकांनी अल्पावधीत तुफान लोकप्रियता मिळवून दिली आहे. त्यामुळे या मालिकेच्या प्रत्येक भागात काय घडणार हे जाणून घेण्याची प्रेक्षकांना कमालीची उत्सुकता असते. सध्या या मालिकेत अनेक ट्विस्ट आणि टर्न्स येत आहेत. यामध्येच नेहा, परीला एकटं सोडून ऑफिसच्या कामासाठी लंडनला रवाना झाली आहे. त्यामुळे चौधरी कुटुंबातील प्रत्येक जण परीची काळजी घेत आहेत. परंतु, सिम्मी एकमेव अशी व्यक्ती आहे जी परीला त्रास देण्याचा प्रयत्न करते. मात्र, आता सिम्मीचा डाव तिच्यावरच उलटणार आहे.

नेहाच्या गैरहजेरीत मिथीला परीची आईसारखी काळजी घेत आहे. अगदी परीला काय हवं, काय नको याच्याकडे जातीने लक्ष देत आहे. मात्र, तरीदेखील सिम्मी तिचे कटकारस्थानं करत आहेत. यामध्येच आता मिथीलाने परीसाठी केलेल्या सांबारामध्ये सिम्मी जास्त तिखट टाकायला सांगते ज्यामुळे परीला त्रास होतो. मात्र, तिचा हा डाव आजोबांसमोरच उलटा होता.

झी मराठीने या मालिकेचा एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये परीला तिखट लागल्यावर मिथीला धावत जाऊन तिच्यासाठी गुळ घेऊन येते. तर, आजोबा सिम्मीला सांबार तिखट कसं झालं असा जाब विचारतात. आजोबांनी विचारलेल्या प्रश्नामुळे सिम्मी घाबरते आणि आपला डाव फसला याची जाणीव तिला होते. तर दुसरीकडे मिथीला ज्या प्रमाणे परीची काळजी घेते ते पाहून आजोबा तिच्यावर खुश होता. दरम्यान, आता सिम्मीच्या सांगण्यावरुन मिथीलाने सांबारमध्ये तिखट जास्त घातलं हे सत्य आजोबांना कळणार का? सिम्मीला शिक्षा होणार का? या प्रश्नांची उत्तर प्रेक्षकांना मालिका पाहिल्यावरच मिळणार आहेत.
 

Web Title: mazi tuzi reshimgath pari and simmi special episode

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.