नेहा-यशसाठी परीचा पुढाकार; आजोबांना पत्र लिहून दूर करणार नाराजी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2022 17:51 IST2022-05-31T16:41:03+5:302022-05-31T17:51:56+5:30
Mazi tuzi reshimgath: सध्या सोशल मीडियावर या मालिकेचा एक प्रोमो व्हायरल होत आहे. यामध्ये नेहा आजोबांची माफी मागायला आजोबांकडे जाते.

नेहा-यशसाठी परीचा पुढाकार; आजोबांना पत्र लिहून दूर करणार नाराजी
'माझी तुझी रेशीमगाठ' (mazi tuzi reshimgath) ही मालिका सध्या छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका म्हणून चर्चेत आहे. सध्या या मालिकेत अनेक ट्विस्ट आणि टर्न्स येत असतानाच आता मालिकेत एक मोठं रंजक वळण आलं आहे. नेहाचं सत्य आजोबांसमोर आल्यामुळे ते यशवर नाराज झाले आहेत. इतकंच नाही तर यशदेखील घर सोडून निघून गेला आहे. मात्र, या सगळ्यामध्ये परी या दोघांमधील गैरसमज दूर करणार आहे.
मिथिला आणि विश्वजीत यांच्या लग्नाच्या वाढदिवशी नेहा, परीची आई असल्याचं सत्य आजोबांसमोर येतं. त्यामुळे आजोबा प्रचंड दुखावले जातात. इतकंच नाही तर यश आणि त्यांच्यात मतभेद निर्माण होऊन ते एकमेकांशी बोलणं बंद करतात. रागाच्या भरात यशदेखील पॅलेस सोडून नेहाच्या घरी राहायला जातो. मात्र, आता या नातू आणि आजोबांमधील रुसवा परी दूर करणार आहे.
सध्या सोशल मीडियावर या मालिकेचा एक प्रोमो व्हायरल होत आहे. यामध्ये नेहा आजोबांची माफी मागायला आजोबांकडे जाते. सोबतच घडलेल्या प्रकारात एकट्या यशची चूक नसल्याचंही सांगते. मात्र, आजोबा तिचं ऐकून घ्यायला तयार नसतात. मात्र, आजोबा-नेहाचं बोलणं होत असतानाच परी आजोबांसाठी एक पत्र लिहिते. हे पत्र ती त्यांना देते.
दरम्यान, चिमुकल्या परीने लिहिलेलं पत्र पाहून आजोबांचे डोळे पाणावतात. त्यामुळे आता आजोबा नेहा-यशला माफ करणार का? परीचा नात म्हणून स्वीकार करणार का? असे अनेक प्रश्न नेटकऱ्यांना पडले आहेत. मात्र, या प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना मालिका पाहिल्यावरच मिळणार आहेत.