'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेतील अभिनेत्रीची फसवणूक; तब्बल २२ हजारांचा घातला गंडा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2022 12:44 PM2022-02-24T12:44:10+5:302022-02-24T12:44:56+5:30

Dhanashri bhalekar: 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेतील जवळपास सगळेच पात्र प्रेक्षकांना ठावूक आहेत. मात्र, काही दिवसांपूर्वीच या मालिकेत एका नव्या अभिनेत्रीची एन्ट्री झाली होती.

mazi tuzi reshimgath serial actress dhanashri bhalekar Online fraud | 'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेतील अभिनेत्रीची फसवणूक; तब्बल २२ हजारांचा घातला गंडा

'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेतील अभिनेत्रीची फसवणूक; तब्बल २२ हजारांचा घातला गंडा

googlenewsNext

छोट्या पडद्यावरील 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेतील एका अभिनेत्रीची मोठी आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे. या अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट करत तिची फसवणूक झाल्याचं सांगितलं आहे. इतकंच नाही तर तिला चक्क २२ हजारांचा मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला आहे. 

'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेतील जवळपास सगळेच पात्र प्रेक्षकांना ठावूक आहेत. मात्र, काही दिवसांपूर्वीच या मालिकेत एका नव्या अभिनेत्रीची एन्ट्री झाली होती. ही अभिनेत्री केवळ एका भागापुरतीच या मालिकेत आली होती. मात्र, तिच्या अभिनयामुळे ती प्रेक्षकांच्या स्मरणात राहिली.  मालिकेत सूनयना केरकर या नव्या पात्राची एन्ट्री झाल्याचं साऱ्यांच्याच लक्षात असेल. यशसोबत लग्नाची बोलणी करण्यासाठी सुनयना आली होती. हीच भूमिका साकारणाऱ्या धनश्री भालेकर या अभिनेत्रीची आर्थिक फसवणूक झाली आहे.
धनश्रीने अनेक हिंदी, मराठी मालिकांमध्ये काम केलं आहे. मात्र, तरीदेखील तिची फसवणूक झाल्याचं तिने या व्हिडीओमध्ये म्हटलं आहे.

पाहा काय आहे नेमकं प्रकरण?
 
डिसेंबर २०२१ मध्ये धनश्रीला एका वेबसीरिजसाठी विचारणार करण्यात आली होती. यासाठी तिला बालाजी टेलिफिल्म्सकडून ऑफरही आली होती.कास्टिंग बालाजी टेलिफिल्म्स डॉट कॉम या इमेल आयडीवरून तिला, तिचं सिलेक्शन झाल्याचा मेल आला. इतकंच नाही तर तिच्याविषयी टॅलेंट ट्रँककडून तिच्याविषयीची माहिती मिळाल्याचंही या मेलमध्ये नमूद करण्यात आलं होतं. त्यामुळे धनश्रीने यावर विश्वास ठेवला. तसंच या वेब सीरिजचं चित्रीकरण मुंबई, हैदराबाद येथे होणार असून झी5 वर ती सीरिज प्रदर्शित होईल असं तिला सांगण्यात आलं. 

वेब सीरिजच्या चित्रीकरणापूर्वी धनश्रीला काही कागदपत्र जमा करण्यास सांगितले होते. परंतु, मुंबईचं ऑफिस बंद असल्यामुळे तिला हैदराबादच्या ऑफिसमध्ये हे डॉक्युमेंट्स जमा करावी लागतील असं सांगितलं. तसंच हैद्राबादला विमानाने येण्यासाठी ‘बालाजी २०’ असा एक प्रोटोकॉल तिला दिला गेला आणि तिकीट बुक करण्यासाठी सांगितले. यागोदरही धनश्रीने असे प्रोजेक्ट्स केले होते त्यामुळे तिला याबाबत काहीच शंका आली नाही. परंतु तिकीट बुक करायच्या वेळेस प्रोसेस होत नसल्याचे तिने त्यांना कळवले. 

दरम्यान,  इंडिगोकडून विमानाची तिकीटं बूक झाली आहेत. परंतु, पेमेंट पेंडिंग असल्याचं तिला एक रेकॉर्ड कॉल आला. त्यानंतर त्यांनी तिला एक नंबर पाठवून २२ हजार ३४८ रुपये एवढी तिकीटाची रक्कम गुगल पे करायली सांगितली. विशेष म्हणजे हे पेमेंट करताना तिच्या स्क्रीनवर इंडिगोचं नावही आलं होतं. तसंच सीट बूक झाल्याचं कन्फर्मेशनही मिळालं. मात्र, १० फेब्रुवारी रोजी तिने फ्लाइट घेण्यापूर्वी कन्फर्मेशन चेक करायला प्रयत्न केला. तर तिचा कोणासोबतच संपर्क होत नव्हता. तसंच ज्या व्यक्तीने तिचं नाव वेबसीरिजसाठी सुचवलं तो अनिकेत कुमारही तिचे फोन घेत नव्हता. यावरुन आपली फसवणूक झाल्याचं तिच्या लक्षात आलं.

पोलिसांत तक्रार दाखल

धनश्रीने यासंदर्भात मुंबईतील बालाजी टेलिफिल्म्सच्या ऑफिसमध्ये जाऊन माहिती दिली. पण हा नंबर आणि नाव आमच्या टीमचं नसल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच तिने याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
 

Web Title: mazi tuzi reshimgath serial actress dhanashri bhalekar Online fraud

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.