माझी तुझी रेशीमगाठ: रागाच्या भरात यशने सोडलं घर; आजोबा अन् नातवाच्या नात्यात कडवपणा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2022 05:45 PM2022-05-30T17:45:00+5:302022-05-30T17:45:02+5:30
Mazi tuzi reshimgath: यश, नेहा आणि घरातील अन्य मंडळी आजोबांना बरेच प्रयत्न करुन समजावण्याचा प्रयत्न करतात. मात्र, ते ऐकण्यास तयार होत नाहीत. त्यामुळे यश घर सोडून निघून जातो.
'माझी तुझी रेशीमगाठ' ही मालिका सध्या अत्यंत रंजक वळणावर येऊन ठेपली आहे. परी आणि नेहा यांचं सत्य आजोबांसमोर आलं आहे. त्यामुळे सध्या चौधरी कुटुंबात गंभीर वातावरण निर्माण झालं आहे. इतकंच नाही तर आजोबांनी यशसोबतही अबोला धरला आहे. त्यामुळे ही मालिका सध्या एका वेगळ्याच ट्रॅकवर सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. इतकंच नाही तर या सगळ्यामध्ये आता यश चौधरींचा पॅलेस सोडून चक्क नेहासोबत तिच्या चाळीत राहायला जाणार आहे.
मिथीला आणि विश्वजीत यांच्या लग्नाचा वाढदिवस साजरा होत असतानाच आजोबा परीला दत्तक घेण्याची घोषणा करतात. हे ऐकल्यावर यश आजोबांना परीचं आणि नेहाचं सत्य सांगतो. परंतु, एवढी मोठी गोष्ट लपवून ठेवल्यामुळे आजोबा नाराज होतात आणि यशसोबत अबोला धरतात.
यश, नेहा आणि घरातील अन्य मंडळी आजोबांना बरेच प्रयत्न करुन समजावण्याचा प्रयत्न करतात. मात्र, ते ऐकण्यास तयार होत नाहीत. त्यामुळे यश घर सोडून निघून जातो. व्हायरल होत असलेल्या प्रोमोमध्येदेखील यश, नेहाच्या घरी चाळीत राहत असून मिथीला त्याला फोनवर समजावण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, यश ऐकण्यास तयार नाही.
दरम्यान, आता आजोबांचा राग जाईल का? यश पुन्हा पॅलेसवर जाईल का? आणि सगळ्यात महत्त्वाचं नेहा-यशचं लग्न होईल का? असे अनेक प्रश्न प्रेक्षकांना पडले आहेत. मात्र, या प्रश्नांची उत्तरं मालिका पाहिल्यावरच प्रेक्षकांना मिळणार आहेत.