स्वीटूची पार्लर मालकीण ‘ममता काकी’ला ओळखलंत ना? ‘माझ्या नवऱ्याची बायको’मध्ये गुरूला दिला होता चांगलाच चोप
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2021 08:00 AM2021-07-11T08:00:00+5:302021-07-11T08:00:06+5:30
‘येऊ कशी तशी मी नांदायला’ मालिकेतील स्वीटू ही एका पार्लर मध्ये काम करतेय, त्याच पार्लरची मालकीण म्हणजे ममता काकी...
झी मराठीवरील ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ ही मालिका सध्या चांगलीच गाजतेय. ओम आणि स्वीटूची केमिस्ट्री, स्वीटूचा निरागस चेहरा सगळंच काही प्रेक्षकांना भावतंय. मालिकेतील पात्रही प्रचंड लोकप्रिय झाली आहेत. अगदी नलू मावशीपासून तर ममता काकींपर्यंत सगळीच. मालिका एका रंजक वळणावर पोहोचलीये. दिलेलं प्रत्येक वचन पूर्ण करत ओम व स्वीटूची ही लव्हस्टोरी पूर्ण होणार का? हे येणाऱ्या एपिसोडमध्ये आपल्याला दिसणार आहेत. पण तूर्तास या लव्हस्टोरीबद्दल नाही तर या लव्हस्टोरीचा एक महत्त्वपूर्ण भाग असलेल्या ममता काकीबद्दल आम्ही सांगणार आहोत.
स्वीटू ही एका पार्लर मध्ये काम करतेय, त्याच पार्लरची मालकीण म्हणजे ममता काकी. ही ममता काकी ही नेहमी स्वीटूला घालून पाडून बोलताना तुम्ही पाहिलीच असेन. शिवाय मालविकाच्या सांगण्यावरून तिनं स्वीटूच्या लग्नासाठी मुद्दाम जाड मुलाचं स्थळ सुचवलं होत, हेही तुम्हाला आठवत असणारच. आज आपण हीच ममता काकीची भूमिका जिवंत करणाऱ्या अभिनेत्रीबद्दल जाणून घेणार आहोत.
ही भूमिका साकारली आहे ती वर्षा पडवळ या अभिनेत्रीने. वर्षा पडवळ यांना तुम्ही यापूर्वी अनेक मालिकांत पाहिलं असेलच. माझ्या नव-याची बायको, सुखी माणसाचा सदरा, श्रीमंत घरची सून, डॉक्टर डॉन, सहकुटुंब सहपरिवार, देव पावला, मोलकरीणबाईअशा अनेक मालिकांत त्यांनी छोटे मोठे पण महत्वाच्या भूमिका त्यांनी वठवल्या आहेत.
माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेत त्यांनी लेडी सिक्युरिटी गार्डचा रोल तुम्हाला आठवत असेलच. त्यात त्यांनी गुरुनाथला दिलेला चोप हा गमतीदार भाग प्रेक्षकांच्या चांगलाच लक्षात राहिला. ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ मालिकेमुळे अभिनेत्री वर्षा पडवळ चांगल्याच लोकप्रिय झाल्या आहेत.
मालिकांव्यतिरिक्त त्यांनी काही शॉर्ट फिल्ममध्ये देखील भूमिका साकारल्या आहेत. अभिनया सोबत त्यांना डान्स करायची देखील खूप आवड आहे. ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ मालिकेत त्या खडूस, स्वार्थी आणि घालून पडून बोलणा-या ममता काकी बनल्या असल्या तरी खऱ्या आयुष्यात त्या खूप मनमिळावू आहेत, हे सांगायला नकोच.