गुरु आणि राधिकाचा मित्र आनंद रिअलमध्येही ‘गुज्जू भाय’, त्याची ‘रिअल लाइफ जेनी’सुद्धा पाहा किती सुंदर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2019 02:37 PM2019-03-21T14:37:30+5:302019-03-21T14:42:15+5:30
मालिकेतील आनंद गुजराती दाखवण्यात आला आहे. मात्र प्रत्यक्ष जीवनातही आनंद गुजराती असून त्याचे नाव मिहीर निशीथ राजदा असं आहे. मुंबईत जन्म झाला असल्यामुळे आनंद ही भूमिका साकारताना चांगल्या पद्धतीने मराठी बोलतो.
छोट्या पडद्यावर माझ्या नवऱ्याची बायको ही मालिका गेल्या काही वर्षांपासून गाजते आहे. या मालिकेला रसिकांनी डोक्यावर घेतलं आहे. या मालिकेतील राधिका, गुरुनाथ आणि शनाया यांचा अभिनय रसिकांच्या पसंतीस पात्र ठरत आहे. विशेषतः राधिका आणि शनायाची जुगलबंदी रसिकांना भावते आहे. राधिका, शनाया आणि गुरूसह आणखी काही पात्र विशेष लक्षवेधी तसंच रसिकांच्या काळजात घर करून आहेत. यांत रेवती, गुप्ते, गुरूचे आई-बाबा, अथर्व, श्रेयस, पानवलकर, सौमित्र, नाना, नानी, केडी, शनायाची आई, आनंद, जेनी ही पात्रंही रसिकांच्या परिचयाची झाली आहेत. आधी गुरुनाथच्या आणि आता राधिकाच्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या स्टाफपैकी दोघं म्हणजे आनंद आणि जेनी. मालिकेत आनंद आणि जेनीच्या जीवनातील नवा टप्पा सुरू होत असल्याचे पाहायला मिळत आहे. दोघांचा साखरपुडा पार पडला असून दोघं मालिकेत रेशीमगाठीत अडकणार आहे.
मालिकेतील आनंद गुजराती दाखवण्यात आला आहे. मात्र प्रत्यक्ष जीवनातही आनंद गुजराती असून त्याचे नाव मिहीर निशीथ राजदा असं आहे. मुंबईत जन्म झाला असल्यामुळे आनंद ही भूमिका साकारताना चांगल्या पद्धतीने मराठी बोलतो. मिहीरने मुंबई विद्यापीठातून कॉमर्सची पदवी घेतली आहे. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना तो एकांकिकांमध्ये सहभागी होऊ लागला. त्याचा अभिनय पाहून मित्रांनी त्याला याच क्षेत्रात करिअर करण्याचा सल्ला दिला. मित्रांमुळेच त्याला व्यावसायिक नाटकंसुद्धा मिळाली.
महाविद्यालयीन जीवनातील मिहारचे फोटो पाहिल्यास हाच का तो मिहीर असा प्रश्न कुणालाही पडेल. माझ्या नवऱ्याची बायको मालिकेतील आनंद आणि मिहीर राजदा यांची प्रेमकहाणी काहीशी मिळतीजुळती आहे. मिहीरने रिअल लाइफमध्ये घरच्यांच्या परवानगीने मराठी मुलीशी प्रेमविवाह केला आहे. मिहीर राजदा आणि नीलम पांचाळ २०१० साली रेशीमगाठीत अडकले. या दोघांच्या आयुष्यात २०१३ साली एका गोंडस मुलीचं आगमन झालं. मिहीर आपल्या कुटुंबासह नवी मुंबईत राहत असल्याचे समजतंय.