माझ्या नवऱ्याची बायकोमधील सौमित्र म्हणजेच अद्वैत दादरकरची पत्नी आहे ही प्रसिद्ध अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2020 11:55 AM2020-01-12T11:55:00+5:302020-01-12T11:55:01+5:30

खऱ्या आयुष्यात देखील सौमित्र म्हणजेच अद्वैत विवाहित असून त्याची पत्नी देखील अभिनयक्षेत्रात असून तिने तिच्या अभिनयगुणांनी प्रेक्षकांचे मन जिंकले आहे.

mazya navryachi bayko saumitra aka advait dadarkar is married to bhakti desai in real life | माझ्या नवऱ्याची बायकोमधील सौमित्र म्हणजेच अद्वैत दादरकरची पत्नी आहे ही प्रसिद्ध अभिनेत्री

माझ्या नवऱ्याची बायकोमधील सौमित्र म्हणजेच अद्वैत दादरकरची पत्नी आहे ही प्रसिद्ध अभिनेत्री

googlenewsNext
ठळक मुद्देअद्वैत दादरकरची पत्नी भक्ती देसाई असून तिच्या तू म्हणशील तसं या नाटकाला सध्या प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे.

सगळ्यांचा मित्र, ज्याच्या येण्यामुळे वातावरणात चैतन्य येतं, मित्रांच्या जीवाला जीव लावणारा, मजा मस्करी करणारा आणि वेळ प्रसंगी समोरच्याला धडा शिकवणारा माझ्या नवऱ्याची बायको मालिकेमधील सौमित्र म्हणजे अभिनेता अद्वैत दादरकर... अद्वैत सौमित्रच्या व्यक्तिरेखेमुळे महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचला. या मालिकेत नुकतेच राधिका आणि सौमित्र यांचे लग्न झाल्याचे आपल्याला पाहायला मिळाले आहे. खऱ्या आयुष्यात देखील सौमित्र म्हणजेच अद्वैत विवाहित असून त्याची पत्नी देखील अभिनयक्षेत्रात असून तिने तिच्या अभिनयगुणांनी प्रेक्षकांचे मन जिंकले आहे.



अद्वैतच मराठी नाट्यक्षेत्रात देखील खूप योगदान आहे. मराठी रंगभूमीवर त्याच्याप्रमाणेच त्याची पत्नी देखील देखील प्रसिद्ध आहे. अद्वैत दादरकरची पत्नी भक्ती देसाई असून तिच्या तू म्हणशील तसं या नाटकाला सध्या प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे. या नाटकांचे दिग्दर्शन प्रसाद ओकने केले असून या नाटकाची निर्मिती प्रशांत दामले यांनी केली आहे. तसेच या नाटकात तिच्यासोबत संकर्षण कऱ्हाडे महत्त्वाच्या भूमिकेत आहे. या नाटकातील भक्तीच्या अभिनयाचे सध्या चांगलेच कौतुक होत आहे.



भक्तीने नाटकांप्रमाणेच मालिकेत देखील काम केले आहे. झी मराठीवरील अरुंधती या प्रसिद्ध मालिकेत ती मुख्य भूमिकेत झळकली होती. अद्वैत आणि भक्ती यांना एक मुलगी असून त्या दोघांच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवर आपल्याला तिचे फोटो पाहायला मिळतात. तिचे नाव मीरा असून ती खूपच गोंडस आहे.



अद्वैत आणि भक्ती दोघे एकमेकांना कॉलेज जीवनापासूनच ओळखतात. कॉलेजमध्ये असताना तो नाटकाचे दिग्दर्शन करायचा तर भक्ती नाटकात काम करायची. त्यामुळेच त्या दोघांचा परिचय झाला. काहीच महिन्यात त्यांच्या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले आणि काही वर्षांनी त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

Web Title: mazya navryachi bayko saumitra aka advait dadarkar is married to bhakti desai in real life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.