एमसी स्टॅनचे मुलींना फ्लर्टी मेसेज, स्क्रिनशॉट व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2025 12:06 IST2025-03-24T12:05:36+5:302025-03-24T12:06:05+5:30

एमसी स्टॅनचे काही स्क्रिनशॉट सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत.

Mc Stan Accused Of Sending Flirty Texts To Influencers Viral Screenshots | एमसी स्टॅनचे मुलींना फ्लर्टी मेसेज, स्क्रिनशॉट व्हायरल

एमसी स्टॅनचे मुलींना फ्लर्टी मेसेज, स्क्रिनशॉट व्हायरल

Mc Stan: बिग बॉस 16 चा विजेता आणि रॅपर एमसी स्टॅन (MC Stan) हा एक लोकप्रिय रॅपर आहे. त्याची सोशल मीडियावरही मोठी फॅन फॉलोविंग आहे. अलीकडेच गर्लफ्रेंड बुबासोबतब्रेकअप झाल्यानंतर एमसी स्टॅन गायब झाला होता. एवढेच काय काय तर सूरत, नाशिक, पनवेल आणि मुंबई या ठिकाणी एमसी स्टॅन हरवल्याचे पोस्टरही लागले होते. आता यानंतर तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. एमसी स्टॅनचे काही स्क्रिनशॉट सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत.

एमसी स्टॅन याने इन्स्टाग्रामवर मुलींना फ्लर्टी मेसेज केल्याचं समोर आलं आहे. एका मुलीने एमसी स्टॅनचा स्क्रिनशॉटमध्ये शेअर करत म्हटलं, "माझ्या डीएममध्ये एमसी स्टॅन काय करतोय…". स्क्रिनशॉर्टमध्ये "मला तुझा फोन नंबर मिळेल… तू खरंच खूप सुंदर आहेस", असा मेसेज एमसी स्टॅन याने केला दिसतोय. यासोबतच त्याने नायला हुसैन नावाच्या एका इन्फ्लुएंसर देखील मेसेज पाठवले आहेत. हे स्क्रिनशॉट रेडिट या साईटवर व्हारलही झाले आहेत. ज्यामुळे रॅपरला चांगलेच ट्रोल केले जात आहे. 

२०२४ मध्ये एमसी स्टॅनने त्याची जुनी मैत्रीण बूबा हिच्याशी ब्रेकअप झाल्याचं उघड केलं होतं. जेव्हापासून त्याच्या ब्रेकअपची घोषणा केली, तेव्हापासून तो सोशल मीडियावरून गायब  झाला होता. त्याची शेवटची पोस्ट ३० नोव्हेंबर २०२४ रोजी केली होती. एमसी स्टॅन नेहमीच त्याच्याजवळ असलेल्या महागड्या वस्तूंमुळे प्रसिद्ध झाला होता. मग ते '८० हजार के जुते' हे रील त्याच्यामुळेच सुरु झाले. एमसी स्टॅनचं खरं नाव 'अल्ताफ शेख' असं आहे. 

Web Title: Mc Stan Accused Of Sending Flirty Texts To Influencers Viral Screenshots

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.