Me Honar Superstar: 'या' ग्रुपनं जिंकलं विजेतेपद, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2022 12:13 PM2022-08-22T12:13:34+5:302022-08-22T12:29:57+5:30

Me Honor Superstar: मुंबईचा राम पंडीत, संगमनेरची वर्षा एखंडे, सांगलीचा लोककलेचे शिलेदार ग्रुप आणि गोव्याच्या जिग्यासा ग्रुपमध्ये महाअंतिम लढत रंगली.

Me Honor Superstar: Lokkaleche Shiledar group won Me Honar Superstar title | Me Honar Superstar: 'या' ग्रुपनं जिंकलं विजेतेपद, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी

Me Honar Superstar: 'या' ग्रुपनं जिंकलं विजेतेपद, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी

googlenewsNext

स्टार प्रवाहवरील ‘मी होणार सुपरस्टार आवाज कुणाचा महाराष्ट्राचा’ कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा नुकताच पार पडला. मुंबईचा राम पंडीत, संगमनेरची वर्षा एखंडे, सांगलीचा लोककलेचे शिलेदार ग्रुप आणि गोव्याच्या जिग्यासा ग्रुपमध्ये महाअंतिम लढत रंगली. अटीतटीच्या या लढतीत सांगलीच्या लोककलेचे शिलेदार ग्रुपने बाजी मारत विजेतेपदावर मोहोर उमटवली. तर उपविजेता ठरला मुंबईचा राम पंडीत. जिग्यासा ग्रुपने तृतीय क्रमांक पटकावला तर संगमनेरच्या वर्षा एखंडेला उल्लेखनिय कामगिरी केल्याबद्दल गौरवण्यात आलं. लोककलेचे शिलेदार या विजेत्या ग्रुपला तीन लाख आणि सन्मानचिन्ह देण्यात आलं. या कार्यक्रमाचं वेगळेपण म्हणजे लोककला, शास्त्रीय संगीत, ड्युएट, ग्रुप सॉन्ग अशी संगीतातील विविधता या मंचावर पाहायला मिळाली.

विजेतेपदाचा आनंद व्यक्त करताना, ‘हा दिवस स्वप्नवत असल्याची भावना लोककलेचे शिलेदार ग्रुपने व्यक्त केली. जिंकल्याचा आनंद तर नक्कीच आहे मात्र ही लोककला महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचावी ही इच्छा होती. स्टार प्रवाहच्या मी होणार सुपरस्टार आवाज कुणाचा महाराष्ट्राचा कार्यक्रमामुळे हे शक्य झालं. या मंचाने खूप गोष्टी शिकवल्या. पारंपारिकतेला आधुनिकतेची जोड देत आम्ही नवनवे प्रयोग केले. सलील कुलकर्णी, आदर्श शिंदे, बेला शेंडे यांसारखे गुरु लाभले याचा अतिशय आनंद आणि अभिमान आहे अशी भावना लोककलेचे शिलेदार ग्रुपची प्रतिनिधी माधवी माळीने व्यक्त केली.’

लोककलेचे शिलेदार जरी या पर्वाचे विजेते असले तरी महाअंतिम फेरीतील सर्वच स्पर्धकांनी या पर्वात आपली चमकदार कामगिरी दाखवली आहे..

Web Title: Me Honor Superstar: Lokkaleche Shiledar group won Me Honar Superstar title

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.