मी, मोगॅम्बो आणि कांदेपोहे: सुबोध भावे-मधुरा वेलणकर यांची नवी शॉर्टफिल्म
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2023 19:58 IST2023-05-03T19:57:34+5:302023-05-03T19:58:41+5:30
Short Film: नुकताच या शॉर्टफिल्मचा जबरदस्त टीझर आणि पोस्टर सोशल मीडियावर लाँच करण्यात आला.

मी, मोगॅम्बो आणि कांदेपोहे: सुबोध भावे-मधुरा वेलणकर यांची नवी शॉर्टफिल्म
मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेता म्हणजे सुबोध भावे. आपल्या दमदार अभिनयशैलीमुळे सुबोध भावेने प्रेक्षकांची मनं जिंकली. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक सिनेमा, मालिकांची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असतात. यामध्येच आता सुबोध भावे एका शॉर्टफिल्मच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात अभिनेत्री मधुरा वेलणकर त्याच्यासोबत स्क्रीन शेअर करणार आहे.
अभिनेता सुबोध भावे आणि अभिनेत्री मधुरा वेलणकर आता 'मी, मोगॅम्बो आणि कांदेपोहे' या शॉर्टफिल्ममध्ये दिसणार आहेत. कौशिक मराठे यांची प्रस्तुती असलेल्या आणि अद्भुत प्रॉडक्शन्सच्या मोनिका धारणकर व वैभव पंडित यांची निर्मिती असलेली ही शॉर्टफिल्म १२ मे रोजी सोशल मीडियाद्वारे प्रदर्शित होणार आहे.
नुकताच या शॉर्टफिल्मचा जबरदस्त टीझर आणि पोस्टर सोशल मीडियावर लाँच करण्यात आला. या शॉर्टफिल्ममध्ये अनिरुद्ध देवधर आणि सलोनी दैनी हे पण प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. सहज लिखाणासाठी ओळख असलेल्या मोनिका धारणकर यांनी या फिल्मचं लेखन केल आहे आणि ऍड-फिल्म मेकर वैभव पंडीत यांचं दिग्दर्शन आहे.