म्हणून मेघा चक्रबोर्तीला येतेय घराची आठवण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2019 06:30 AM2019-01-15T06:30:00+5:302019-01-15T06:30:00+5:30

मकर संक्रांतीच्या सणाची सध्या सगळीकडे लगबग आहे.‘स्टार प्लस’वरील ‘कृष्णा चली लंडन’ मालिकेत कृष्णाची भूमिका साकारणारी अभिनेत्री मेघा चक्रबोर्ती हिला घरी साजरी होणाऱ्या मकर संक्रांतीच्या सणाची आठवण झाली. 

Megha Chakraborty misses home on Makar Sankranti | म्हणून मेघा चक्रबोर्तीला येतेय घराची आठवण

म्हणून मेघा चक्रबोर्तीला येतेय घराची आठवण

googlenewsNext
ठळक मुद्देकोलकात्यात मकर संक्रांतीचा सण अतिशय उत्साहात साजरा केला जातो''यावर्षी माझी आईच मुंबईला आली असून ती माझ्यासाठी हे पारंपरिक पदार्थ बनविणार आहे''

मकर संक्रांतीच्या सणाची सध्या सगळीकडे लगबग आहे.‘स्टार प्लस’वरील ‘कृष्णा चली लंडन’ मालिकेत कृष्णाची भूमिका साकारणारी अभिनेत्री मेघा चक्रबोर्ती हिला घरी साजरी होणाऱ्या मकर संक्रांतीच्या सणाची आठवण झाली. 

या सणाच्या आठवणी जागवताना मेघा म्हणाली, “कोलकात्यात मकर संक्रांतीचा सण अतिशय उत्साहात साजरा केला जातो. यावेळी कोलकात्याचे रस्ते रंगीबेरंगी पतंगांनी भरून जातात आणि सर्वत्र घरी बनविण्यात येत असलेल्या विविध मिठाया आणि गोड स्वादिष्ट पदार्थांचा दरवळ भरून राहातो. या सणानिमित्त माझी आई नेहमी पुली पीठे, पयेश आणि रोसो पुली या स्वादिष्ट पदार्थ घरी बनवीत असे आणि मी त्यावर ताव मारीत असे. मालिकांमध्ये भूमिका साकारणाऱ्या कलाकारांना चित्रीकरणाची  वेळापत्रकं सांभाळावी लागतात आणि त्यांना दर सणवाराला आपल्या घरी जाता येत नाही. त्यामुळे यावर्षी माझी आईच मुंबईला आली असून ती माझ्यासाठी हे पारंपरिक पदार्थ बनविणार आहे. त्यामुळे यंदा संक्रांतीचा सण हा मी घरगुती वातावरणात तर साजरा करणार आहेच; पण आमच्या मालिकेच्या सेटवरही मी माझ्या विस्तारित कुटुंबाबरोबर तो साजरी करणार आहे.” 

आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी मुलींनी ठाम निश्चय करावा, असा संदेश ही अभिनेत्री मालिकेतील आपल्या कृष्णाच्या भूमिकेद्वारे देत असून आता मकर संक्रांतीचा सण आपल्या सहकलाकारांबरोबर साजरा करणार आहे.

Web Title: Megha Chakraborty misses home on Makar Sankranti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.