छोट्या पडद्यावरील कलाकार सुयश टिळक,रूची सवर्ण रमले कॉलेजच्या आठवणीत

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2017 11:39 AM2017-02-21T11:39:12+5:302017-02-21T17:09:12+5:30

सध्या छोट्या पडद्यावरचे कलाकार हे शूटिंगमध्ये नाहीतर त्यांच्या कॉलेजच्या आठवणींमध्ये रमताना दिसतायेत. कॉलेजचे दिवस सगळ्यांत सुंदर मस्तीचे दिवस म्हणून ...

In the memory of small screen artist Suyash Tilak, Ruchi Sarvarn Ramle College | छोट्या पडद्यावरील कलाकार सुयश टिळक,रूची सवर्ण रमले कॉलेजच्या आठवणीत

छोट्या पडद्यावरील कलाकार सुयश टिळक,रूची सवर्ण रमले कॉलेजच्या आठवणीत

googlenewsNext
्या छोट्या पडद्यावरचे कलाकार हे शूटिंगमध्ये नाहीतर त्यांच्या कॉलेजच्या आठवणींमध्ये रमताना दिसतायेत. कॉलेजचे दिवस सगळ्यांत सुंदर मस्तीचे दिवस म्हणून प्रत्येकजण या आठवणी आपल्या मनाच्या कोप-यात साठवून ठेवत असतो. यात आपले मराठी सेलिब्रेटींनाही आपले कॉलेजचे दिवस आठवू लागले आहेत.निमित्त होते कॉलेज फेस्टीव्हलचे.सध्या कॉलेजसमध्ये फेस्टीव्हलची धूम सुरु आहे. सगळ्याच कॉलेजेसमध्ये उत्साहाचे आणि जोशपूर्ण वातावरण आहे. अशा माहोलमध्ये जर तुमचे लाडके कलाकार तुम्हाला भेटायला थेट तुमच्या कॉलेजमध्ये आले तर ? या फेस्टीव्हलची रंगत आणखी वाढणार आणि फुल ऑन मजा मस्ती पाहायला मिळणार नाही का? तर छोडा आभ्यासातून वेळ काढूनी खेळ खेळुया चला म्हणत आपले छोट्या पडद्यावरील कलाकरांनी थेट भेट दिली आपल्या कॉलेजच्या विद्यार्थांना.'सख्या रे', 'अस्स सासर सुरेख बाई', 'कॉमेडीची बुलेट ट्रेन' आणि '2 MAD' या कार्यक्रमातील कलाकार नुकतेच विद्यालंकार कॉलेजमध्ये विद्यार्थांची भेट घेण्यासाठी गेले होते. आपल्या लाडक्या कलाकारांना कॉलेजमध्ये बघून विद्यार्थ्यांना आनंद झाला. जवळजवळ ८००-१००० विद्यार्थी या फेस्टीव्हलच्या निमित्ताने आपल्या आवडत्या कलाकारांना भेटायला आले होते. कॉलेजमध्ये बऱ्याच प्रकारच्या ऍक्टिव्हीटी राबाविण्यात आल्या होत्या.  'सख्या रे' मालिकेमधील  सुयश टिळक आणि रुची सवर्ण यांनी विद्यार्थांमध्ये फुल ऑन रमताना दिसले.'अस्स सासर सुरेख बाई'मधील महाराष्ट्राची लाडकी मृणाल दुसानीस आणि श्वेता पेंडसे, कॉमेडीची बुलेट ट्रेन मधील विनोदवीर योगेश शिरसाट आणि नम्रता आवटे आणि '2 MAD – महाराष्ट्राचा अस्सल डान्सर' या सध्या गाजत असलेल्या कार्यक्रमातील स्पर्धकांनी म्हणजेच निखील, आर्या डोंगरे, सोनल विचारे आणि मंगेश यांनी विद्यार्थ्यांशी संवाद देखील साधला.यावेळी  बघून प्रेक्षकांनी त्यांना झालेला आनंद आपल्या टाळ्यांच्या आवाजाने व्यक्त केला. मृणालने प्रेक्षकांसाठी गाण देखील म्हंटल जे प्रेक्षकांना खूपच आवडले. 



सुयश आणि रुची यांनी “सख्या रे” मालिकेच्या शीर्षक गीतावर डान्स केला. यावेळी आम्हाला आम्हाला आमच्या कॉलेज दिवस आठवले, थोड्यावेळासाठी का होईना पण पुन्हा एकदा कॉलेजचा तोच उत्सहा अंगात संचारला होता आणि पुन्हा एकदा कॉलेजच्या त्या दिवसात रमताना खूप आनंद लुटता आल्याचे या कालाकरांनी आपले मत व्यक्त केले. 
तसेच या विद्यार्थांनी आम्हाला त्यांचे सुंदर अॅक्ट सादर करत फुल ऑन एंटरटेन केले खरेच खुप रिफ्रेश झाल्यासारखे वाटतेय. आता हाच उत्साह आमच्या पुढच्या कामासाठी आम्हाला प्रेरित करत राहणार असल्याचे रूची सवर्णने सांगितले. तसेच '2 MAD – महाराष्ट्राचा अस्सल डान्सर' या सध्या गाजत असलेल्या कार्यक्रमातील स्पर्धकांनी म्हणजेच निखील, आर्या डोंगरे, सोनल विचारे आणि मंगेश यांनी आपल्या तुफान डान्सने विद्यार्थ्यांची मने जिंकली.

Web Title: In the memory of small screen artist Suyash Tilak, Ruchi Sarvarn Ramle College

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.