कलर्स वाहिनीवरील देव ही मालिका प्रेक्षकांचा घेणार निरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2017 07:14 AM2017-10-31T07:14:15+5:302017-10-31T12:44:15+5:30

कलर्स या वाहिनीवर प्रेक्षकांना देव ही मालिका पाहायला मिळत आहे. देवानंद नावाचा डिटेक्टिव्ह विविध केसेस कशाप्रकारे सोलव्ह करतो हे ...

The message from the Goddess of Colors will be taken by the audience | कलर्स वाहिनीवरील देव ही मालिका प्रेक्षकांचा घेणार निरोप

कलर्स वाहिनीवरील देव ही मालिका प्रेक्षकांचा घेणार निरोप

googlenewsNext
र्स या वाहिनीवर प्रेक्षकांना देव ही मालिका पाहायला मिळत आहे. देवानंद नावाचा डिटेक्टिव्ह विविध केसेस कशाप्रकारे सोलव्ह करतो हे या मालिकेत जाखवले जाते. ही मालिका सुरू होऊन काहीच दिवस झाले असले तरी या मालिकेला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. या मालिकेत प्रेक्षकांना आशिष चौधरी, सुमोना चक्रवर्ती, पूजा बॅनर्जी यांच्या मुख्य भूमिका पाहायला मिळत आहेत. या मालिकेतील व्यक्तिरेखा आणि या मालिकेची संकल्पना प्रेक्षकांना चांगलीच आवडत आहे. पण या मालिकेच्या फॅन्ससाठी एक वाईट बातमी आहे. ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचे म्हटले जात आहे. ही मालिका लवकरच संपणार असल्याची चर्चा आहे. या मालिकेचा शेवटचा भाग नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
देव ही मालिका केवळ २६ भागांचीच असणार असे या मालिकेच्या निर्मात्यांनी सुरुवातीलाच ठरवले होते. त्यामुळे हा निर्णय काही लगेचच घेण्यात आलेला नाहीये. त्यामुळे २६ भाग पूर्ण झाल्यानंतर ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असे सुरुवातीलाच कलाकारांना सांगण्यात आले होते. आता या मालिकेचा क्लायमॅक्स जवळ आलेला आहे आणि त्यानुसार ही मालिका संपणार आहे. केवळ २६ भागांच्या ऐवजी या मालिकेचे २७ भाग प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. २६ भागात या मालिकेची कथा दाखवणे शक्य नसल्याने केवळ एक भाग जास्त चित्रीत करण्याचा निर्णय या मालिकेच्या टीमने घेतला. देव या मालिकेचा शेवटचा भाग १८ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 
देव या मालिकेची टीम सध्या चित्रीकरण करत आहे. हे चित्रीकरण पाच नोव्हेंबर पर्यंत संपणार असल्याची चर्चा आहे. देव या मालिकेत सुमोना चक्रवर्ती एक मुख्य भूमिका साकारते. पण काही दिवसांपूर्वी या मालिकेच्या सेटवर येत असताना ती चक्कर येऊन पडली होती आणि तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मालिकेच्या शेवटच्या भागांमध्ये सुमोनाने असणे अतिशय गरजेचे असल्याने या मालिकेच्या टीमने चित्रीकरण काही दिवस पुढे ढकलेले असल्याचे म्हटले जात आहे. 

Also Read : ​सुमोना चक्रवतीला चक्कर आल्याने रुग्णालयात करण्यात आले दाखल

Web Title: The message from the Goddess of Colors will be taken by the audience

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.