'चुकभूल द्यावी घ्यावी' मालिका घेणार रसिकांचा निरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2017 04:33 AM2017-07-18T04:33:52+5:302017-07-18T10:03:52+5:30
छोट्या पडद्यावरील सध्या गाजत असलेली 'चुकभूल द्यावी घ्यावी' ही मालिका लवकरच रसिकांचा निरोप घेणार आहे. ही मालिका रसिकांचा निरोप ...
छ ट्या पडद्यावरील सध्या गाजत असलेली 'चुकभूल द्यावी घ्यावी' ही मालिका लवकरच रसिकांचा निरोप घेणार आहे. ही मालिका रसिकांचा निरोप घेत असली तरी तिच्या जागी येणा-या मालिकेची सध्या जोरदार चर्चा सुरु झाली आहे. चुकभूल द्यावी घ्यावी या मालिकेच्या जागी गाव गाता गजाली ही नवी मालिका 2 ऑगस्टपासून रसिकांच्या भेटीला दाखल होत आहे. रात्रीस खेळ चाले या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहचलेला पांडु अर्थातच लेखक प्रल्हाद कुडतरकर याला प्रसिद्धीच्या शिखरावर नेलं. कोकणची संस्कृती, तिथली गावं, माणसं आणि मालवणी भाषा हे सगळं वैभव 'रात्रीस खेळ चाले' या मालिकेच्या माध्यमातून पुन्हा एकदा जगासमोर आणलं. आता कोकणचं तेच वैभव आणि संस्कृती पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर 'गाव गाता गजाली' या मालिकेमधून पाहायला मिळणार आहे.प्रल्हाद कुडतरकरनं यांत पुन्हा एकदा लेखक आणि अभिनेता अशा दुहेरी जबाबदारीचं शिवधनुष्य पेललं आहे. रात्रीस खेळ चाले आणि 100 डेज या मालिकेचे निर्माते संतोष कणेकर यांनीच गाव गाता गजाली या मालिकेची निर्मिती केली आहे. राजू सावंत यांनी या मालिकेचं दिग्दर्शन केले आहे. गप्पा मारणं हा कोकणी माणसाचा आवडता उद्योग. मालवणी भाषेत याच गप्पांना गजाली असं म्हटलं जातं. गावागावातल्या भानगडींपासून ते राष्ट्रीय असो किंवा मग थेट परदेशात घडणा-या घडामोडी असो या सगळ्यांवर गप्पांचा फड कोकणातल्या गावागावात चांगलाच रंगतो. इरसाल माणसांच्या याच इरसाल गजाली आता छोट्या पडद्यावरही रसिकांना अनुभवता येणार आहेत. विविध माणसांची विविध रुपं, त्यांचे स्वभाव, त्यांची स्वप्नं याचं दर्शन 'गाव गाता गजाली' या मालिकेतून होणार आहे.कोकणातलं निसर्गरम्य मिठबाव हे गाव या मालिकेच्या निमित्ताने छोट्या पडद्यावर झळकणार आहे. त्यामुळे कोकणातील इरसाल माणसं, त्यांच्या गजाली 2 ऑगस्टपासून अनुभवण्यासाठी सज्ज व्हा.