#MeToo झगमगत्या दुनियेचं काळंकुट्ट वास्तव शमा सिकंदरने केले उघड, 14 वर्षांची असताना घडले होते असे काही
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2018 15:18 IST2018-10-22T15:12:16+5:302018-10-22T15:18:08+5:30
दिग्दर्शकाने तिच्या मांडीवर हात ठेवला. तिला स्पर्श करण्याचा प्रयत्न करू लागला. शमाला त्या दिग्दर्शकाचा हेतू समजताच तिने स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केला.

#MeToo झगमगत्या दुनियेचं काळंकुट्ट वास्तव शमा सिकंदरने केले उघड, 14 वर्षांची असताना घडले होते असे काही
आजवर हिंदी चित्रपटसृष्टीत बंद खोलीआड होणा-या कास्टिंग काऊचची चर्चा होती. अनेक कलाकार आणि मॉडेल्सनी अशाप्रकारचे आरोप केले होते. मात्र यावर केवळ आरोप झाले आणि चर्चा रंगली. आता याच विषयावर अनेक अभिनेत्री पुढे येत आपली आपबिती सांगत आहेत. दरदिवशी चित्रपटसृष्टीतील कुणी ना कुणी #MeToo अंतर्गत आपल्यावर झालेल्या अन्याय आणि अत्याचारांना सोशल मीडिया किंवा माध्यमातून वाचा फोडत आहेत. या आरोपांनंतर चित्रपटृष्टीतलं वातावरण पूर्णपणे ढवळून गेले आहे. झालेल्या आरोपांमध्ये नवनवीन गौप्यस्फोट किंवा मग नवा आरोप यामुळे चित्रपटसृष्टीला जणू काही #MeToo ग्रहण लागल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. या अंतर्गत अनेक अभिनेत्री आपल्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडत आहे. तनुश्री दत्ता, कंगणा राणौत, काल्की कोचलिन, रिचा चढ्ढा, सोनम कपूर, सुचित्रा कृष्णमूर्ती, विनता नंदा, केट शर्मा अशा कित्येकजणींनी आपल्यावर झालेल्या अन्याय आणि अत्याचारांना वाचा फोडली आहे. यांत आणखी एका अभिनेत्रीचे नाव घ्यावं लागेल. ही अभिनेत्री म्हणजे शमा सिंकदर.
करियरच्या सुरूवातीला अनेक दिग्दर्शकांनी त्रास दिल्याचा आरोप तिने केला आहे. काम देण्याच्या बहाण्याने बऱ्याच दिग्दर्शकांनी विविध मागण्या केल्या. वयाच्या 14 वर्षांची असताना माझ्यासोबत गैरवर्तन झाले होते. स्ट्रगल करत असताना एका दिग्दर्शकाला भेटायला ती गेली होती. त्याच दरम्यान दिग्दर्शकाने तिच्या मांडीवर हात ठेवला. तिला स्पर्श करण्याचा प्रयत्न करू लागला. शमाला त्या दिग्दर्शकाचा हेतू समजताच तिने स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी दिग्दर्शकाने तिला सांगितले की, इथे तुला कोणीही सोडणार नाही, अभिनेते आणि निर्माते तुझा फायदा घेतीलच. तु या गोष्टीशिवाय पुढे जाऊच शकणार नाही.
शमा सिंकदरने 'ये मेरी लाइफ है', 'सेवन' आणि 'बालवीर' या मालिकेत 'भयंकर परी'च्या व्यक्तिरेखेतून ती लोकप्रिय झाली होती.या तिच्या निवडक टीव्ही मालिका आहेत. तर 'प्रेम अगन', 'मन' 'अंश' 'धूम धडाका' या सिनेमांमध्येही ती झळकली होती.