MeToo: टीव्ही अभिनेत्री हेलेन फ्रोन्सेका यांना अजूनही न्यायाची प्रतीक्षा! साई बलालवर केला गैरवर्तनाचा आरोप!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2018 07:15 PM2018-10-25T19:15:21+5:302018-10-25T19:15:52+5:30

‘मीटू’ मोहिमेने ढवळून निघालेल्या वातावरणात आणखी एका अभिनेत्रीने आपल्या मीटू स्टोरीविरोधात आवाज उठवला आहे. ही अभिनेत्री आहे कलर्स वाहिनीवरील ‘उडान सपनों की’ या मालिकेची अभिनेत्री हेलेन फोन्सेका.

MeToo: udaan actor helen fonseca accused sai ballal of sexual harassment | MeToo: टीव्ही अभिनेत्री हेलेन फ्रोन्सेका यांना अजूनही न्यायाची प्रतीक्षा! साई बलालवर केला गैरवर्तनाचा आरोप!

MeToo: टीव्ही अभिनेत्री हेलेन फ्रोन्सेका यांना अजूनही न्यायाची प्रतीक्षा! साई बलालवर केला गैरवर्तनाचा आरोप!

googlenewsNext

मीटू’ मोहिमेने ढवळून निघालेल्या वातावरणात आणखी एका अभिनेत्रीने आपल्या मीटू स्टोरीविरोधात आवाज उठवला आहे. ही अभिनेत्री आहे कलर्स वाहिनीवरील ‘उडान सपनों की’ या मालिकेची अभिनेत्री हेलेन फोन्सेका. याच मालिकेचा अभिनेता साई बलालवर हेलेन यांनी गंभीर आरोप केले आहेत. २०१५मधील घटना पुन्हा ताजी करत हेलेन यांनी साई बलालविरोधात पुन्हा एकदा आवाज उठवला आहे. साई बलालने हेलेन यांना अश्लिल व्हिडिओ व मॅसेज पाठवल्याचा आरोप आहे.
हेलेन यांनी सांगितले की, २०१५ मध्ये साई बलालने माझा लैंगिक छळ केला. याप्रकरणी मदत मागण्यासाठी मी गुरूदेव भल्लाच्या पत्नीकडे गेली. मात्र त्यांनी मला पुन्हा भल्लाकडे पाठवले. गुरूदेव भल्ला या प्रकरणात मध्यस्ती करू शकले असते. पण त्यांनी केवळ एक मॅसेज पाठवून माझी बोळवण केली. तुम्ही दोघेही समजदार आहात. तुला हे प्रकरण वाढवायचे असेल तर गवर्निंग बॉडीजवळ जा, असा मॅसेज त्यांनी मला पाठवला. यानंतर मेकर्सने मला संध्याकाळपर्यंत कॉल टाईम देण्यासाठी म्हटले. मी वाट बघत राहिले. रात्री त्यांना कॉल आला. सॉरी, आम्ही आज तुमच्यासोबत शूटींग करू शकत नाही, असे मेकर्सनी मला कळवले. चार दिवस हेच चालले. यानंतर मला शोमधून बाहेर काढण्यासाठी डर्टी गेम खेळला. माझी भूमिका एका दुसऱ्या अभिनेत्रीला दिली गेली. मी यावर आक्षेप घेतला असताना क्रिएटीव्ह हेड भरत चौकसी आणि प्रॉडक्शन हेड अभिषेक अग्रवाल यांनी सगळ्यांसमोर मला अपमानास्पद वागणूक दिली. यानंतर मी सिन्टाकडे गेले. पण सिन्टानेही माझी मदत केली. अखेर मला शो सोडावा लागला. मी शो सोडल्यानंतर मेकर्सनी साई बलालसोबत दीड वर्षे काम केले. मला कुणीच न्याय दिला नाही. सिंटा आणि माझ्या दिग्दर्शक व निर्मात्यावर मला विश्वास होता. पण दुदैवाने कुणीच माझी मदत केली नाही. मला न्याय मिळेल का? हाच माझा प्रश्न आहे.
२०१५ मध्ये हेलेन यांनी साई बलालविरोधात पोलिस तक्रारही दाखल केली होती. पण त्यांना त्याच दिवशी जामिन मिळाला.

Web Title: MeToo: udaan actor helen fonseca accused sai ballal of sexual harassment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.