'शक्तीमान' परततोय !

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2016 10:52 AM2016-05-10T10:52:12+5:302016-05-10T16:24:26+5:30

पंडित गंगाधर विद्याधर मायाधर ओमकारनाथ शास्त्री.. एक सामान्य व्यक्ती.. सामान्य असूनही मनःशांती आणि ध्यानधारणा करुन त्यानं सुपरपॉवर मिळवली... शत्रूचा ...

'Mighty' is returning! | 'शक्तीमान' परततोय !

'शक्तीमान' परततोय !

googlenewsNext
class="ii gt m15494d9bb534700e adP adO" id=":4yw" style="font-size: 12.8px; direction: ltr; margin: 5px 15px 0px 0px; padding-bottom: 5px; position: relative; color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; line-height: normal;">
पंडित गंगाधर विद्याधर मायाधर ओमकारनाथ शास्त्री.. एक सामान्य व्यक्ती.. सामान्य असूनही मनःशांती आणि ध्यानधारणा करुन त्यानं सुपरपॉवर मिळवली... शत्रूचा तो कर्दनकाळ ठरला.. तो म्हणजे सा-यांचा लाडका शक्तीमान.. छोट्या पडद्यावर 1990 च्या दशकात छोट्या पडद्यावर शक्तीमान ही मालिका आली आणि बघता बघता या मालिकेनं बच्चेकंपनीच्या मनात अढळ स्थान मिळवलं.. मुकेश खन्ना यांनी साकारलेली शक्तीमान ही भूमिका आजही प्रत्येकाच्या स्मरणात आहे.. शक्तीमानची पुन्हा एकदा आठवण येण्याची कारण म्हणजे सा-यांचा लाडका शक्तीमान पुन्हा एकदा परत येतोय.. याचनिमित्त शक्तीमान मुकेश खन्ना यांनी सीएनएक्ससोबत साधलेला हा खास संवाद

* शक्तीमान पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर येणार असल्याचं समजतंय. किती एक्साईटेड आहात ?
शक्तीमान पुन्हा एकदा बच्चेकंपनीच्या भेटीला येणार आहे हे खरं आहे. शक्तीमान सुरु झाल्यापासूनच मला बच्चेकंपनीचं खूप प्रेम मिळालं. या मालिकेनंतर जिथे जिथे मी गेलो तिथे तिथे चिमुकले माझ्याभोवती गराडा घालतात. माझ्यासोबत फोटो आणि ऑटोग्राफ घेण्यासाठी त्यांची धडपड असते. आजही मला ते शक्तीमान म्हणूनच ओळखतात. हे सारं पाहून पुन्हा एकदा शक्तीमान घेऊन येण्याचा विचार पुढे आला.

* 'शक्तीमान' पुन्हा येणार म्हटल्यावर त्यासाठी काय खास तयारी केली आहे ?
शक्तीमान पुन्हा येणार यासाठी काही खास अशी तयारी केलेली नाही. मात्र व्यायाम आणि इतर गोष्टी नित्यनियमाने सुरुच आहेत. बरेच जण माझ्या वयामुळं ही भूमिका कशी साकारणार असा प्रश्न विचारतील.. पण माझ्या मते कोणतीही भूमिका साकारण्यासाठी वय हे महत्त्वाचं नसतं. तसंच वजन वाढवणं किंवा कमी करणं यावरही माझा फारसा विश्वास नाही.. मात्र या भूमिकेसाठी जे जे करावे लागेल ते ते करण्याची तयारी आहे.

shaktimaan

* नव्यानं येणा-या 'शक्तीमान'मध्ये काय काय बदल असेल ?
नव्या शक्तीमानमध्ये कोणताही बदल होणार नाही. 1990 च्या दशकातील मुलांसाठी हा एकप्रकारे नॉस्टॅलजियाच असेल.. मात्र यामधील कोणतीही व्यक्तीरेखा बदलणार नाही. यांत पंडित गंगाधर विद्याधर मायाधर ओमकारनाथ शास्त्री असेल, शक्तीमानही तसाच असेल आणि गीता विश्वाससुद्धा तीच असणार आहे.. फक्त गीताला थोडं वजन कमी करण्यासाठी सांगितलं आहे. अन्यथा यांत कोणताही बदल नसेल.

* ही मालिका कोणत्या वाहिनीवर प्रसारीत केली जाईल ?
शक्तीमान ही मालिका दूरदर्शनवर गाजली होती.. आता नव्यानं शक्तीमान आणताना कोणत्या चॅनलवर आणावी याबाबत प्राथमिक स्तरावर चर्चा सुरु आहे. ती दूरदर्शनवर करावी का अन्य कोणत्या सॅटेलाईट चॅनलवर ते अजून ठरलेलं नाही. लवकरच त्याचाही निर्णय होईल.

* तुमचे खास फॅन म्हणजे बच्चेकंपनीला काय सांगाल ?
आजच्या युगातील बच्चेकंपनी खेळ विशेषतः मैदानी खेळ विसरत चालली आहे. त्यांचं जास्त मन हे स्मार्ट फोनमध्येच रमतं. त्यामुळं मी त्यांना सांगेन की स्मार्ट फोन वापरणं बंद करा. त्याचा अतिवापर चांगला नाही. मला वाटतं पालकांनीही यामध्ये विशेष लक्ष दिलं पाहिजे. मुलांचं लहानपण हरवू देऊ नका.. 

Web Title: 'Mighty' is returning!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.