मिका सिंगचं छोट्या पडद्यावर रंगणार स्वयंवर!, मात्र त्याची आहे ही अट

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2022 06:22 PM2022-02-28T18:22:37+5:302022-02-28T18:23:08+5:30

प्रसिद्ध गायक मिका सिंग (Mika Singh) एका टीव्ही शोसाठी स्वयंवरमध्ये सहभागी होणार असल्याचे समजते आहे.

Mika Singh will paint on the small screen on his own !, but this is his condition | मिका सिंगचं छोट्या पडद्यावर रंगणार स्वयंवर!, मात्र त्याची आहे ही अट

मिका सिंगचं छोट्या पडद्यावर रंगणार स्वयंवर!, मात्र त्याची आहे ही अट

googlenewsNext

बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत(Rakhi Sawant)ने नॅशनल टीव्हीवर तिच्या स्वयंवरमध्ये भाग घेतल्यानंतर, राहुल महाजन, रतन राजपूत आणि मल्लिका शेरावत यांनी देखील असेच शो केले ज्यामध्ये त्यांनी त्यांचे जीवन साथीदार निवडले आणि हा शो नॅशनल टीव्हीवर प्रसारित झाले. आता प्रसिद्ध गायक मिका सिंग  (Mika Singh) एका टीव्ही शोसाठी स्वयंवरमध्ये सहभागी होणार असल्याचे वृत्त आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा शो येत्या काही महिन्यांत प्रसारित होणार आहे आणि मिका सिंग या शोमध्ये सहभागी होण्यासाठी खूप उत्साहित आहे. या शोमध्ये सहभागी होणारे स्पर्धक देशभरातील असतील. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रिअॅलिटी शो पूर्वीच्या स्वयंवरांसारखाच असेल. काही महिन्यांत हा शो प्रसारित करण्याची योजना आहे. शोमध्ये मिका लग्न करणार नाही, तो फक्त एंगेजमेंट करेल आणि त्यानंतरच त्यांचे नाते पुढे नेईल. 

राखी सावंत होणार सहभागी?

मिळालेल्या माहितीनुसार, आगामी शो खूपच मनोरंजक असणार असून त्याची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. शोचा फॉरमॅट अतिशय काळजीपूर्वक तयार करण्यात आला असून, कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन राखी सावंतही त्यात सहभागी होऊ शकते. मीका सिंग आणि राखी सावंत यांच्यात बऱ्याच दिवसांपासून वाद सुरू आहे कारण एका पार्टीत सिंगरने राखी सावंतला जबरदस्तीने किस केले होते आणि तेव्हापासून दोघांमध्ये बराच वेळ भांडण सुरू होते. तथापि, दोन्ही सेलिब्रिटींनी शेवटी त्यांचे मतभेद सोडवले, म्हणूनच राखी सावंत देखील आगामी शोचा एक भाग असण्याची शक्यता आहे.

Web Title: Mika Singh will paint on the small screen on his own !, but this is his condition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.