मिका सिंगचं लवकरच रंगणार स्वयंवर!, 'मिका दी वोटी' शोचा नवीन म्युझिक व्हिडीओ झाला रिलीज
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2022 18:43 IST2022-05-17T18:42:33+5:302022-05-17T18:43:01+5:30
Mika Singh: गायक मिका सिंग गेल्या बऱ्याच दिवसांपासून आपल्या स्वयंवरच्या निमित्ताने चर्चेत आहे.

मिका सिंगचं लवकरच रंगणार स्वयंवर!, 'मिका दी वोटी' शोचा नवीन म्युझिक व्हिडीओ झाला रिलीज
गायक मिका सिंग गेल्या बऱ्याच दिवसांपासून आपल्या स्वयंवरच्या निमित्ताने चर्चेत आहे. उत्तम जीवनसाथीसाठी त्याने स्वयंवराची निवड केली आहे. त्यासाठी तो वरातीसह वधूच्या शोधासाठी निघाला आहे. दरम्यान, त्यांच्या स्वयंवर संदर्भात एक नवीन गाणे रिलीज करण्यात आले आहे. ज्यामध्ये मिका आपली निवड सांगताना दिसत आहे.
व्हिडिओमध्ये मिका सिंग पंजाबी मुंडाच्या लूकमध्ये दिसत असून यासोबतच संपूर्ण गाण्यात पंजाबची संस्कृती दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. हे गाणे पंजाबीमध्ये आहे, ज्यामध्ये मिका म्हणत आहे की तो भारतात स्वत:साठी कुडी शोधत आहे. पंजाबीपासून बंगाली, मराठी आणि राजपुतानीपर्यंत अनेक मुली गायकासोबत वधूच्या गेटअपमध्ये नाचताना दिसत आहेत. मिका सिंगचा स्वयंवर स्टार भारत दाखवणार आहे.
गायक शानने मिका सिंगच्या 'स्वयंवर: मिका दी वोटी' या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करण्याची जबाबदारी घेतली आहे. या व्यतिरिक्त मिकाचे इतर अनेक सेलिब्रिटी मित्र आहेत जे त्याला वधू शोधण्यासाठी मदत करणार आहेत. यामध्ये टीव्ही अभिनेता शाहीर शेख आणि करण वाहीसह अनेक स्टार्सचा समावेश आहे. १९ जून पासून 'स्वयंवर - मिका दी वोटी' हा शो भेटीला येणार आहे.